कोरोना अन् अतिवृष्टीनंतर यांत्रिकीकरणावर शेतकऱ्यांचा वाढला भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 02:23 PM2020-12-23T14:23:46+5:302020-12-23T14:23:52+5:30

ट्रॅक्टरची मागणी वाढली, ऊसतोडणी, मळणीसाठी हार्वेस्टरचा वापर

Increased emphasis of farmers on mechanization after heavy rains in Corona | कोरोना अन् अतिवृष्टीनंतर यांत्रिकीकरणावर शेतकऱ्यांचा वाढला भर

कोरोना अन् अतिवृष्टीनंतर यांत्रिकीकरणावर शेतकऱ्यांचा वाढला भर

googlenewsNext

राजकुमार सारोळे

सोलापूर : सरत्या वर्षात मार्चमध्ये आलेल्या कोरोना महामारीने सर्वच क्षेत्रावर परिणाम केला. यातून शेतीही सुटली नाही. पण कोरोना महामारी व अतिवृष्टीचे आलेले संकट हिरारीने झेलत यांत्रिकीकरणावर भर देत स्वालंबी बनण्याचा शेतकऱ्यांनी केलेला धाडसी प्रयोग सर्वच क्षेत्राला प्रेरणादायी ठरला आहे.

२०२० वर्षाला निरोप देण्याचे अवघे आठ दिवस राहिले आहेत. हे वर्ष आयुष्यात कोणीही विसरणार नाही. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीने मानवाला जगण्याचा मंत्र दिला. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनचा फटका उद्योग, व्यापार, शिक्षण, नोकरदार वर्गाला बसला. यातून शेतकरीही सुटला नाही. बेकार झालेले अनेकजण शेतीकडे वळले. लॉकडाऊन काळात शेतीमालाचे भाव मोठ्या प्रमाणावर कोसळले. शेतकर्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेली भाजी, फळे शेतातच राहिली. कवडीमोल भावाने शेतकर्यांने आपला माल विकला. पण यातून शहरातील बेकार लोकांना राेजगार मिळाला. शेतकऱ्यांसमोरील हे संकट जाते न तोच दिवाळीच्या तोंडावर म्हणजे ॲाक्टोबरमध्ये अतिवृष्टीचे संकट आले. यात खरिपाचे नुकसान तर झालेच अन रब्बीवरही परिणाम झाला. पुराने कित्येक शेतीबरोबर संसार वाहून गेला तरीही न डगमगता शेतकरी उभा राहत असल्याचे आशादायी चित्र आहे. त्यामुळे लॉकडाऊनंतर ट्रॅक्टर व उसतोडणीच्या हावेर्स्टरची विक्रमी विक्री झाली.

ट्रॅक्टरला मागणी वाढली

३१ मार्च २०२० अखेर आरटीओकडे ३० हजार ९६१ ट्रॅक्टरची नोंद होती. एप्रील२०१९ ते मार्च २०२० या काळात २ हजार ८४५ ट्रॅक्टरची नोंद झाली. त्यानंतर लॉकडाऊनमुळे शोरूम बंद होते. लॉकडाऊन उठल्यानंतर सप्टेंबर महिन्यात १ हजार ६१ ट्रॅक्टरची नोंद झाली. विशेष म्हणजे सप्टेंबर २०१९ मध्ये केवळ १६७ ट्रॅक्टर विकले गेले होते. एप्रील ते नोव्हेंबरअखेर २ हजार ५१९ ट्रॅक्टरची नोंद झाली. शेतकर्यांनी पेरणीसाठी २५ ते३५ हॉर्सपॉवर आणि नांगरणीसाठी५० एचपीचे टॅक्टर खरेदीवर भर दिला आहे. लॉकडाऊनमुळे कंपन्या बंद असल्याने छोट्या ट्रॅक्टरसाठी शेतकर्यांना वेंटिगवर रहावे लागत असल्याचे चित्र आहे.

हॉवेर्स्टरचाही वापर वाढला

तूर व उस काढणीसाठी शेतकर्यांनी हावेर्स्टरचा वापर सुरू केला आहे. तुरीसाठी पंजाबहून हार्वेस्टर आले आहेत. तर उसतोडणीसाठी नवे२० हावेर्स्टर दाखल झाले असून. आणखी १५हावेर्स्टरची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे. उसतोडणीसाठी मजूर मिळत नसल्याने आधुनिकतेचा वापर वाढला आहे.

Web Title: Increased emphasis of farmers on mechanization after heavy rains in Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.