गावकारभाऱ्यांच्या मूकसंमतीमुळे अतिक्रमणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:27 AM2021-06-09T04:27:53+5:302021-06-09T04:27:53+5:30

वाखरी गाव पंढरपूर शहरालगत आहे. त्यामुळे गावातील जागांचे भावही गगनाला भिडले आहेत. गावठाण आणि पंढरपूर शहराच्या हद्दीलगत असलेल्या भागात ...

Increased encroachment due to tacit consent of villagers | गावकारभाऱ्यांच्या मूकसंमतीमुळे अतिक्रमणात वाढ

गावकारभाऱ्यांच्या मूकसंमतीमुळे अतिक्रमणात वाढ

Next

वाखरी गाव पंढरपूर शहरालगत आहे. त्यामुळे गावातील जागांचे भावही गगनाला भिडले आहेत. गावठाण आणि पंढरपूर शहराच्या हद्दीलगत असलेल्या भागात सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढू लागले आहे. ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, स्मशानभूमीच्या खुल्या जागा, गावातील रस्त्याच्या बाजूला आणि अनेक ठिकाणी चक्क रस्त्यावरच अतिक्रमण केले जात आहे. अनेक लोकांनी राजकीय वरदहस्त घेऊन राहण्यासाठी जागा बळकावल्या आहेत. पत्राशेड आणि पक्की बांधकामे केली आहेत. विशेष म्हणजे या अतिक्रमणास पायबंद घालण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी नेहमीच कानाडोळा केला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून गावात अतिक्रमण वाढीस लागले आहे. मात्र, एकही अतिक्रमण हटविण्याची तत्परता दाखविण्यात आलेली नाही.

याच बेबंदशाहीचा लाभ उठवत गेल्या काही महिन्यांपासून लोकांनी चक्क काँक्रीटच्या रस्त्यावर अतिक्रमणे करून रस्ते बंद केले आहेत. यामुळे गावाला बकालपण आले आहे. शिवाय लाखो रुपये किमतीच्या जागा बळकावल्या जात आहेत. नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक झाली. यानंतर सत्तेत आलेल्या आणि विरोधात असलेल्या दोन्ही आघाडीच्या सदस्य, पदाधिकाऱ्यांनीही या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले आहे. ही अतिक्रमणे काढली जावीत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Web Title: Increased encroachment due to tacit consent of villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.