माढ्यात गावच्या राजकारणात तरुणाईचा वाढला प्रभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:24 AM2021-01-19T04:24:27+5:302021-01-19T04:24:27+5:30
कुर्डूवाडी : माढ्यात ८२ ग्रामपंचायत निवडणूकीच्या निकालावरून तरुणांची गावच्या राजकारणात झालेली जोरदार एन्ट्री अनेक गावांतील मातब्बरांना पराभूतीची धूळ चारण्यास ...
कुर्डूवाडी : माढ्यात ८२ ग्रामपंचायत निवडणूकीच्या निकालावरून तरुणांची गावच्या राजकारणात झालेली जोरदार एन्ट्री अनेक गावांतील मातब्बरांना पराभूतीची धूळ चारण्यास कारणीभूत ठरली आहे. माढ्यातील शासकीय गोदामात मतमोजणीदरम्यान तरुणांच्या फौजा मूडमध्ये निकाल ऐकण्यास जमा झाल्या. अनेक गावांत यंदा तरुणांचे मतदान वाढले. यामुळे तरुण हे या निवडणुकीत निर्णायक ठरले असून काही ठिकाणी वाॅर्डनिहाय व उमेदवार निहाय क्रॉस व्होटींग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तालुक्यातील बहुतांशी गावात सत्तापरिवर्तन झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतचा निकाल जाहीर होताच एकत्र येत आनंदोत्सव साजरा न करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असले तरी विजयाचा आनंद नियमांना रोखू शकलेला नाही. पोलीस बंदोबस्तही तोकडा पडलेला आहे.
कुर्डू, लऊळ, अकुलगाव, सापटणे (टे), उपळाई (बु), उपळाई( खु), उपळवाटे, उंदरगाव, शेडशिंगे, रिधोरे,जाधववाडी,तांदुळवाडी,बुद्रुकवाडी, अंजनगाव(उमाटे),वडाचीवाडी (अ.उ),बेंबळे, सोलंकरवाडी, शिराळ(मा) यासारख्या अनेक मोठ्या गावांचे यंदा सत्तेत परिवर्तन झाले. माढ्यात स्वत:च्या ग्रामपंचायतचा निकाल समजताच विजयी उमेदवारांचा गट एकच जल्लोष साजरा करीत तेथून गावाकडे निघून गेला. फटाक्यांची आतषबाजी आणि फोटोसेशन झाले.
......
फोटो : १८ कुर्डू
कुर्डू येथे नागनाथ ग्रामविकास आघाडीने विजय मिळविल्यानंतर गावात असा जल्लोष केला.