वडाळा येथे बेमुदत साखळी उपोषणनाला सुरुवात; आमदारांना गाव बंदी करण्याचा एकमुखी निर्णय

By शीतलकुमार कांबळे | Published: October 26, 2023 01:42 PM2023-10-26T13:42:34+5:302023-10-26T13:42:49+5:30

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी धनगर समाजानेही पाठिंबा दर्शविला. 

Indefinite chain hunger strike begins in Wadala solapur; decision to ban villages to MLAs maratha reservation protest | वडाळा येथे बेमुदत साखळी उपोषणनाला सुरुवात; आमदारांना गाव बंदी करण्याचा एकमुखी निर्णय

वडाळा येथे बेमुदत साखळी उपोषणनाला सुरुवात; आमदारांना गाव बंदी करण्याचा एकमुखी निर्णय

सोलापूर :  मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष बळीराम साठे यांच्या नेतृत्वाखाली वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील बेमुदत साखळी उपोषणनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी धनगर समाजानेही पाठिंबा दर्शविला. 

त्याचबरोबर उपोषणास बसणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोहोळ व उत्तर सोलापूरचे विद्यमान आमदार यशवंत मानेलाही गाव बंदी करा असे काका साठे व जितेंद्र साठे यांना केले आव्हान. मराठा आरक्षण संदर्भात चाललेल्या साखळी उपोषणची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन बळीराम साठे यांच्या हस्ते करुन करण्यात आले. यावेळी साखळी उपोषणास गावचे सरपंच जितेंद्र साठे, तुषार साठे, मनोज साठे, हरिभाऊ घाडगे, विकास गाडे, जयदीप साठेआदी मराठा समाजासह इतर समाजाचेही बांधव उपस्थित होते.

Web Title: Indefinite chain hunger strike begins in Wadala solapur; decision to ban villages to MLAs maratha reservation protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.