बेमुदत रजा आंदोलन सुरू; शेतकऱ्यांची कामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:15 AM2021-07-08T04:15:50+5:302021-07-08T04:15:50+5:30
मंगळवेढा तालुका तलाठी संघाने तलाठी संवर्गातील मंडल अधिकारी, अव्वल कारकून, नायब तहसीलदारांच्या विविध ३७ मागण्यांसाठी १९ जानेवारी २०२१ पासून ...
मंगळवेढा तालुका तलाठी संघाने तलाठी संवर्गातील मंडल अधिकारी, अव्वल कारकून, नायब तहसीलदारांच्या विविध ३७ मागण्यांसाठी १९ जानेवारी २०२१ पासून बेमुदत रजा आंदोलन पुकारलेले होते. परंतु, वेळोवेळी बैठका व संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करूनही निवेदनातील मुद्यांबाबत प्रशासन गांभीर्यपूर्वक विचार करताना दिसून येत नाही, असे यावेळी निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी अध्यक्ष उमेश सूर्यवंशी, सचिव समाधान वगरे, कार्याध्यक्ष विजय एकतपुरे, सदस्य मधुकर वाघमोडे, विजय शिंदे, बाळू कोळी, श्यामबाला कुंभार, नजमिन मौलवी, बदन राठोड, राजाराम रायभान, सुरज नळे, अनिल चव्हाण, भारत गायकवाड, प्रताप घुनावत, मनोज तवले, सतीश गुरुपवार, मनोज संकपाळ, श्रीरंग लोखंडे, अजय जिरापुरे, भडंगे आदी उपस्थित होते.
कोट :::::::::::::::::::
तलाठी व मंडल अधिकाऱ्यांच्या अडचणी सोडविण्याबाबत प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. म्हणून साेलापूर जिल्हा तलाठी संघ व मंगळवेढा तालुका तलाठी संघटनेने स्थगित केलेले आंदोलन ७ जुलैपासून पुन्हा पुकारले आहे.
- उमेश सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष, तलाठी संघटना मंगळवेढा