सोलापुरातील मंडल अधिकारी, तलाठ्यांचा बेमुदत रजा आंदोलन मागे

By Appasaheb.patil | Published: February 9, 2023 07:48 PM2023-02-09T19:48:40+5:302023-02-09T19:49:09+5:30

अप्पर जिल्हाधिकारी यांनी काढला तोडगा; मागण्याबाबत सकारात्मक विचार

indefinite leave protest of talathi mandal officers of solapur is back | सोलापुरातील मंडल अधिकारी, तलाठ्यांचा बेमुदत रजा आंदोलन मागे

सोलापुरातील मंडल अधिकारी, तलाठ्यांचा बेमुदत रजा आंदोलन मागे

googlenewsNext

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: जिल्ह्यातील मंडल अधिकारी व तलाठी यांनी विविध मागण्यांसाठी ७ फेब्रुवारी २०२३ पासून बेमुदत सामुदायिक रजा आंदोलन पुकारले होते. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत मंडल अधिकारी व तलाठी यांच्या विविध मागण्यांबाबत तसेच अडीअडचणीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

जिल्ह्यातील मंडल अधिकारी व तलाठी यांनी विविध मागण्यांसाठी रजा आंदोलन पुकारल्याने शेतकऱ्यांची व नागरिकांची महसूल विभागाकडे असणारी कामे ठप्प झाली होती. शेतकऱ्यांना व नागरिकांना या आंदोलनामुळे अडअडचणी येवू नयेत तसेच मंडल अधिकारी व तलाठी यांच्या विविध मागण्या व अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, तहसिलदार महसूल, नायब तहसिलदार आस्थापना तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार आणि तलाठी संघटनेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते. मंडल अधिकारी व तलाठी यांच्या विविध मागण्याबाबत तसेच अडीअडचणीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने  मंडल अधिकारी व तलाठी  कार्यालयाचे कामकाज ९ फेब्रुवारी २०२३ पासून आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

मंडल अधिकारी व तलाठ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेक शासकीय कामे ठप्प झाली होती. संपाचा जास्तच परिणाम दिसू लागल्याने जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांनी संघटनेच्या पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढला अन् संप मागे घेण्यास विनंती केली. त्यानुसार संबंधित संघटनेचे संप मागे घेत असल्याबाबत कळविले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: indefinite leave protest of talathi mandal officers of solapur is back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.