अनेक ठिकाणी सत्तांतर.. नव्या चेहऱ्यांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:24 AM2021-01-19T04:24:49+5:302021-01-19T04:24:49+5:30

अक्कलकोट तालुक्यात एकूण ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आणि हंजगी ग्रामपंचायत स्थानिक वादामुळे सर्व ...

Independence in many places .. Opportunity for new faces | अनेक ठिकाणी सत्तांतर.. नव्या चेहऱ्यांना संधी

अनेक ठिकाणी सत्तांतर.. नव्या चेहऱ्यांना संधी

Next

अक्कलकोट तालुक्यात एकूण ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आणि हंजगी ग्रामपंचायत स्थानिक वादामुळे सर्व जागा रिक्त राहिल्या. यामुळे प्रत्यक्षात ६२ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या. चुरशीचे मतदान झाले होते. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता नवीन तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू झाली. एक वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्यात आले. जसजसा निकाल जाहीर होत होता तसतसे विजयाचा गुलाल उधळला गेला. तहसीलदार अंजली मरोड यांनी योग्य नियोजन केल्याने मतमोजणी शांततेत पार पडली.

चप्पळगाव- १३ जागा. उमेश पाटील, अभिजित पाटील, बसवराज बानेगाव, रियाज पटेल सिद्धाराम भंडारकवठे पॅनलला १२ जागा मिळवत संजय बाणेगाव, महादेव वाले, शकीर पटेल गटाचा दारुण पराभव केला. यात अपक्ष-१ विजयी झाला. हन्नूर : जागा ११, सिद्धेश्वर कल्याणशेट्टी नेतृत्वाखालील गटाने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या. मोटयाळ : ७ जागा असून सत्ताधारी कार्तिक पाटील गटाला ४ तर विरोधी गटाला-३ जागेवर समाधान मानावे लागले. चप्पळगाववाडी- ७ जागा, सत्ताधारी दोड्याळे, बंने, परशेट्टी पॅनलचा धुव्वा उडवत अंकलगे, बिराजदार, निकंबे पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या. भोसगे : ७ जागा, पं. स. सदस्य आनंदराव सोनकांबळे, डोंगरे पॅनलचे पराभव करीत सगर, बिराजदार, पाटील गटाने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या. बासलेगाव- जागा-९, सत्ताधारी राठोड, जमादार, पाटील पॅनलचा पराभव करीत जगदीश बिराजदार पॅनेलने सर्व जागा जिंकल्या. सिन्नूर - ९ जागा, स्वामी, काळसगोंडा, पुजारी पॅनलला-३ तर सत्ताधारी हौदे पॅनेलने ६ जागा जिंकल्या. गुरववाडी-९ जागा, अनेक वर्षाचे देवरमनी, स्वामी, रावजी गटाला-३ तर पुजारी पॅनलने ४ जागा जिकल्या. हैद्रा-११ जागा, मुजावर, बिराजदार पॅनेलने १० तर कोगनूर पॅनलला एका जागेवर समाधान मानावे लागले. किणी-११ जागा, साखरे, पाटील, अळळीमोरे या प्रस्थापित पॅनलला केवळ दोन तर तरुण वर्गानी एकत्रित येत तयार केलेल्या अमोल हिप्परगी, रुद्र स्वामी पॅनेलने तब्बल ९ जागा जिंकल्या.

मुगळी:-९ जागा सत्ताधारी जय हनुमान ग्रामविकास पॅनलला-५ तर जय बजरंगबली पॅनलला- ४ जागा मिळाल्या. नागणसूर- जागा-१७, श्री बसवलिंगेश्वर ग्रामविकास पॅनलला- १२ तर प्रचंडे स्थापित नंदी बसवेश्वर पॅनलला केवळ ५ जागा मिळाल्या आहेत. जेऊर-जागा-१७, मल्लिकार्जुन पाटील पॅनलला-१६ तर विरोधी बंदेनवाज कोरबू पॅनलला एकही जागा मिळविता आली नाही. एक जागा रिक्त राहिली. बोरी उमरगे- ७ जागा, माजी सरपंच पंडित पाटील गटाला सर्वच्या सर्व तर विरोधी तेलूणगी, पाटील, अस्वले गटाला एकही जागा मिळविता आली नाही. गौडगाव बु. जागा-११, सत्ताधारी गटाचे वीरभद्र सलगरे गटाने-८ जागा जिंकल्या तर विरोधी सिद्धाराम म्हेत्रे गटाला ३ जागेवर समाधान मानावे लागले. वागदरी जागा-१५, वरनाळे, पोमाजी, ढोपरे, सोनकवडे गटाने ९ तर ठोंबरे, मंगाणे गटाला ४, अपक्ष-१. कुरनूर - जागा-११, सत्ताधारी व्यंकट मोरे गटाला-८ तर बाळू मोरे गटाला-३ जागेवर समाधान मानावे लागले. पाटील, काळे गटाला एकही जागा जिंकता आली नाही. तडवळ-जागा-११, संजीव याबाजी, बुळळा, कर्जगीकर पॅनल-११ तर सदलगी, दोड्याळे, याबाजी, बनसोडे पनशेट्टी सत्ताधारी गटाला एकही जागा मिळाली नाही. चांचोळी (मैं.) जागा - ७, निंगप्पा पाटील गटाला-६ तर सत्ताधारी दादू चितारी, बसवराज सोनकांबळे गटाला २ जागा मिळाल्या. बोरोटी खु. जागा-९, भाजप तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड २० वर्षांपासून आजही ताब्यात ठेवत ७ जागा जिकल्या तर विरोधी गोपाल लोहार, ताराबाई मोरे गटाला केवळ २ जागा मिळाल्या. बोरोटी बु. जागा-९, ढंगापूरे पॅनलला-५ तर बसवंतराव कलशेट्टी गटाला-४ जागा मिळाल्या. कर्जाळ:- जागा-९, गव्हाणे, इंगळे पॅनल-३ तर ढब्बे पॅनलला-६ जागा. बबलाद:- जागा-९, लकाबशेट्टी,मड्डी, रोडगे गटाला-६ तर विरोधी पुजारी गटाला-३ जागा मिळाल्या.

एकंदरीत आजच्या निकालावरून नागणसूर, गुरववाडी, चप्पळगाववाडी, बासलेगाव, भोसगे, किणी, हालहळळी (ह.), बोरोटी बु, चिंचोळी (मैं.), तडवळ, आदी गावात सत्ताधारी गटाला मतदारांनी हादरा देत सत्तांतर घडविले आहे.

-----

फोटोओळ:- भोसगे, ता. अक्कलकोट येथे पंचायत समितीचे सदस्य आनंदराव सोनकांबळे यांच्या गटाचा पराभव करीत बिराजदार, पाटील, सगर गट जल्लोष करताना.

Web Title: Independence in many places .. Opportunity for new faces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.