दोन गावात सत्तांतर.. तीन गावांत सत्ताधाऱ्यांवर विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:23 AM2021-01-20T04:23:08+5:302021-01-20T04:23:08+5:30

नागणसूर गाव राजकीयदृष्ट्या सतत चर्चेत असणारे गाव. येथे कै. गुरुसिद्धप्पा प्रचंडे सांगेल ती पूर्वदिशा होती. त्यांच्या निधनानंतर यंदा सहानुभूती ...

Independence in two villages .. Trust in the authorities in three villages | दोन गावात सत्तांतर.. तीन गावांत सत्ताधाऱ्यांवर विश्वास

दोन गावात सत्तांतर.. तीन गावांत सत्ताधाऱ्यांवर विश्वास

Next

नागणसूर गाव राजकीयदृष्ट्या सतत चर्चेत असणारे गाव. येथे कै. गुरुसिद्धप्पा प्रचंडे सांगेल ती पूर्वदिशा होती. त्यांच्या निधनानंतर यंदा सहानुभूती मिळण्याऐवजी मतदारांनी सत्तांतर घडविले. सर्व पक्षातील पुढाऱ्यांनी एकत्रित येऊन स्थानिक गट तयार करून श्री गुरू बसवलिंगेश्वर चालक-मालक ग्राम विकास पॅनेलने यश मिळविले.

विजयी उमेदवारांमध्ये शशिकांत कळसगोंडा, सिद्धेश्वर गंगोंडा, हजरत पटेल, धनराज धानशेट्टी, शांताबाई प्रचंडे, शकुंतला कोळी, सुनीता चव्हाण, तेजस्वी मंटगी, अंबुबाई नागलगांव, इंदुबाई रेवी, शिलवंती चिंनवार, बसवराज गंगोंडा, तर स्व. गुरुसिद्धप्‍पा प्रचंडे पुरस्कृत श्री नंदी बसवेश्वर ग्रामविकास पॅनेलचे सर्व ईरय्या मठपती, सिद्धाराम शिवमूर्ती, जयभीम वठार, लक्ष्मीबाई प्रचंडे , मल्लम्मा मणुरे यांचा समावेश आहे.

वागदरीत वरनाळे, पोमाजी, ढोपरे, पॅनेलची सत्ता आहे. त्यांच्या विरोधात १५ वर्षांपासून श्रीशैल ठोंबरे लढत देत आले. मात्र, प्रत्येकवेळी वेगवेगळा निकाल पाहायला मिळाला. विजयी उमेदवार असे: श्रीकांत भैरामडगी, पंकज सुतार, सुजाता घुले, शारदाबाई रोटे, शिवानंद घोळसगांव, कावेरी नंजुडे, लक्ष्मीबाई पोमाजी, सिद्धूताई सोनकावडे, महानंदा सावंत (बिनविरोध), गुंडप्पा पोमाजी पॅनेल: श्रीशैल ठोंबरे, अंबुबाई मंगाणे, हनिफ मुल्ला,राजू हुग्गे, रेखा कुंबळे,अपक्ष इंडे श्रीकांत.

बादोल बु. गाव तसं पारंपरिक काँग्रेस पक्षाचे हक्काचे गाव. या गावावर धायगोडे यांचे वर्चस्व. यंदाही सत्ता कायम राहिली. विजयी उमेदवार असे- नागनाथ व्हनझेंडे, विठ्ठल खरात,जयश्री धायगोडे, माणिक धायगोडे, पार्वती धायगोडे, मदिना पठाण, सिद्धाराम बगले, सलिमाबी शेख, सिद्धाराम बिराजदार, भारताबाई गायकवाड, अशरफबी तांबोळी.

चप्पळगाव राजकीयदृष्ट्या वादग्रस्त गाव. या ठिकाणी बेहिशेबी पुढारी, मात्र कोण कधी कोणाला दणका देतील याचा नेम नाही. या गावात यंदा बाजार समिती उपसभापती आप्पासाहेब पाटील, उमेश पाटील, बसवराज बानेगाव, सिद्धाराम भंडारकवठे, रियाज पटेल यांनी स्थानिक गट तयार करून निर्विवाद यश संपादन केले. त्यामधून सुवर्णा कोळी, सिद्धाराम भंडारकवठे, अपर्णा बानेगाव, वंदना कांबळे, रेश्मा तांबोळी, उमेश पाटील, स्वामीराव जाधव, चित्रकला कांबळे, श्रीकांत गजधाने, गंगाबाई वाले (३४३) तर धनश्री वाले, गौराबाई अचलेरे, मल्लिनाथ सोनार हे विजयी झाले.

----

जेऊरची सत्ता अबाधित

जेऊर गाव माजी आमदार कै. महादेवराव पाटील यांचे गाव. तीन पिढ्यांपासून एकहाती सत्ता. यंदा त्यांच्या अनुपस्थितीत जि. प. सदस्य मल्लिकार्जुन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भरघोस यश मिळाले. विजयी उमेदवार: भीमाशंकर वग्गे, राजश्री राठोड, सुनील जाधव, सीता पुजारी, सैफली कोरबू,नागनाथ पाटील, कस्तुरीबाई चप्पळगाव, गिरिजाबाई चौलगी, सिद्धाराम कापसे, जगदेवी हिरेमठ, फराजना मुजावर, श्रीमंत झंपा, इराप्पा कोळी, धोंडाबाई पाटील,रविकांत स्वामी,पार्वती झंपले.

----

Web Title: Independence in two villages .. Trust in the authorities in three villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.