शैक्षणिक चर्चा अन् शेती प्रश्नावर दोघांचीही एकत्र बसण्याची तयारी; अमित ठाकरे-बच्चू कडूंची भेट

By मुकेश चव्हाण | Updated: February 3, 2023 14:49 IST2023-02-03T14:48:26+5:302023-02-03T14:49:35+5:30

आज सोलापूरमध्ये अपक्ष आमदार बच्चू कडू आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांची भेट झाली.

Independent MLA Bachu Kadu and MNS leader Amit Thackeray met in Solapur today. | शैक्षणिक चर्चा अन् शेती प्रश्नावर दोघांचीही एकत्र बसण्याची तयारी; अमित ठाकरे-बच्चू कडूंची भेट

शैक्षणिक चर्चा अन् शेती प्रश्नावर दोघांचीही एकत्र बसण्याची तयारी; अमित ठाकरे-बच्चू कडूंची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. याचदरम्यान त्यांनी अपक्ष आमदार बच्चू कडू यांची भेट घेतली. या भेटीची माहिती स्वत: बच्चू कडू यांनी फेसबुकद्वारे दिली आहे. 

बच्चू कडू फेसबुकवर पोस्ट करत म्हणाले की, विठुरायांच्या पंढरीत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे याची भेट झाली. अमितचा स्वभाव अतिशय मोकळा आहे व महाराष्ट्रासाठी काम करण्याची इच्छाशक्ती देखील आहे. शारीरिक व मानसीक दृष्ट्या श्रम करण्याची तयारी आहे. या भेटीत आमची शैक्षणिक विषमतेवर चर्चा झाली. विदर्भात आल्यावर राजकीय विषयावर न भेटता शेती प्रश्नावर आम्ही एकत्र बसणार आहोत, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. 

दरम्यान, विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून अमित ठाकरे सोलापूर जिल्ह्याच्या प्रथमच दौऱ्यावर अमित ठाकरे सोलापूर जिल्ह्याच्या प्रथमच दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Web Title: Independent MLA Bachu Kadu and MNS leader Amit Thackeray met in Solapur today.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.