भारत स्वदेशी शस्त्रास्त्रासह क्षेपणास्त्रांनी स्वयंपूर्ण!

By संताजी शिंदे | Published: February 29, 2024 07:14 PM2024-02-29T19:14:17+5:302024-02-29T19:14:37+5:30

शास्त्रज्ञ डॉ. देवधर : सोलापूर विद्यापीठात हुडा असोसिएशन व्याख्यानमाला

India is self sufficient with indigenous weapons and missiles | भारत स्वदेशी शस्त्रास्त्रासह क्षेपणास्त्रांनी स्वयंपूर्ण!

भारत स्वदेशी शस्त्रास्त्रासह क्षेपणास्त्रांनी स्वयंपूर्ण!

सोलापूर : चाळीव वर्षांपूर्वी भारताला इतर देशांकडून शस्त्रास्त्रे आयात करावे लागत होते, आज भारत स्वदेशी शस्त्रास्त्र, उपग्रह, अत्याधुनिक क्षेपणास्त्रानी स्वयंपूर्ण असून जगासमोर भारताची ताकद सिद्ध झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ, डीआरडीओचे निवृत्त संचालक डॉ. काशिनाथ देवधर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि ह्युमन यूप्लीटमेंट अँड डेव्हलपमेंट असोसिएशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हुडा असोसिएशन व्याख्यानमालेचे सहावे पुष्प गुंफताना डॉ. देवधर बोलत होते. 'राष्ट्राची एकात्मता व सुरक्षिततेसाठी संरक्षण तंत्रज्ञानातील आत्मनिर्भर भारताचे योगदान' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा हे होते. यावेळी मंचावर कुलसचिव योगिनी घारे  उपस्थितीत होत्या.

डॉ. देवधर म्हणाले की, आज भारताकडील नौसेना, वायुसेना, लष्करी दल या सर्व सेना देशाच्या सुरक्षेसाठी सक्षम असून भारतातील वैज्ञानिकांनी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्रे, उपग्रह बनवून भारत देशाची जगासमोर एक वेगळी ताकद सिद्ध केली आहे. पृथ्वी, आकाश, त्रिशूल, नाग, अग्नी, ब्रह्मास्त्र ही क्षेपणास्त्रे तसेच तेजस लढाऊ विमानाची निर्मिती ही भारताला आत्मनिर्भर बनवत आहे. मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा यासाठी फार मोठे योगदान देशाला लाभले आहे. भारत देश जागतिक महासत्ता बनण्याच्यादृष्टीने संरक्षण क्षेत्रात वाटचाल करीत आहे, असे डॉ.देवधर यांनी सांगितले. प्रास्ताविक सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. श्रुती देवळे यांनी केले.

Web Title: India is self sufficient with indigenous weapons and missiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.