भारताच्या लोकशाहीत अशक्य गोष्टी शक्य होतात : राज्यपाल चे.विद्यासागर राव यांचे स्पष्टीकरण, विद्यापीठातर्फे सुशिलकुमार शिंदेंना डी़ लिट पदवी प्रदान

By Admin | Published: April 26, 2017 03:03 PM2017-04-26T15:03:40+5:302017-04-26T15:23:52+5:30

.

In India's democracy, impossible things are possible: Explanation by the Governor of Vidyasagar Rao, University of Sushilkumar Shindena D. Litt. | भारताच्या लोकशाहीत अशक्य गोष्टी शक्य होतात : राज्यपाल चे.विद्यासागर राव यांचे स्पष्टीकरण, विद्यापीठातर्फे सुशिलकुमार शिंदेंना डी़ लिट पदवी प्रदान

भारताच्या लोकशाहीत अशक्य गोष्टी शक्य होतात : राज्यपाल चे.विद्यासागर राव यांचे स्पष्टीकरण, विद्यापीठातर्फे सुशिलकुमार शिंदेंना डी़ लिट पदवी प्रदान

googlenewsNext


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २६ : एक पेपर टाकणारा ए.पी.जे.आब्दुल कलाम हा मुलगा देशाचा राष्ट्रपती बनु शकतो, लहानपणी रेल्वेत चहा विकणारा मुलगा पंतप्रधान बनतो आणि न्यायालयात पट्टेवाला शिपाई म्हणुन काम करणारा सुशीलकुमार शिंदे हे देशाचे गृहमंत्री बनतात हे भारतीय लोकशहीच खुप मोठ यश आहे. सुशीलकुमार शिंदे यांचा जीवन प्रवास पाहिला तर खुप संघर्षमय असुन त्यांनी मिळवलेले यश येणाऱ्या सध्याच्या व येणाऱ्या पिढीला आदर्श ठरणार आहे असे मत राज्यपाल तथा कुलपती चे.विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.
सोलापूर विद्यापीठाच्या विशेष दीक्षांत समारंभात डी.लिट्. हि पदवी प्रदान केल्यानंतर सुशीलकुमार शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती चे.विद्यासागर राव, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कुलगुरू डॉ. एन.एन.मालदार, प्रभारी कुलसचिव पी.प्रभाकर, परीक्षा नियंत्रक बी.पी.पाटील उपस्थित होते. यावेळी कुलपती चे.विद्यासागर राव यांच्या हस्ते सुशीलकुमार शिंदे यांना डी.लिट्. मानपत्र देवुन सन्मानीत करण्यात आले.
सन्मानाला उत्तर देताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, सोलापूरात ज्ञान आहे, मात्र त्याला योग्य स्थान मिळत नाही हे लक्ष्यात आल्यानंतर २00४ साली मी मुख्यमंत्री असताना जिल्ह्यापुरते मर्यादीत सोलापूर विद्यापीठाचा प्रस्ताव विधानसभेत सादर केला. हा प्रस्ताव पारीत करून घेण्यासाठी शुक्रवारचा दिवस निवडला आणि विद्यापीठ मंजूर करून घेतले. सोमवारी जेव्हां विरोधक सभागृहात आले तेव्हां त्यांना आर्श्चय वाटले, हा प्रस्ताव कधी मंजूर झाला अशी विचारणार त्यांनी केली होती. ज्ञानाच दार सर्व जनतेसाठी खुले असले पाहिजे, गुणवत्ता जर वाढवायची असेल तर खऱ्या आर्थाने प्रत्येक जिल्ह्याला एक विद्यापीठ असणे आवश्यक आहे. सोलापूर विद्यापीठाने कमी वेळेत चांगली प्रगती केली आहे, भविष्यात इथला विद्यार्थी ‘ नासा’ येथे जाईल. आधुनक भारत व महाराष्ट्राच्या जडण घडणीत सोलापूर विद्यापीठाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधार कार्डच्या नंबरसहित पदवी प्रमाणपत्र देत आह, ही खुप चांगली गोष्ट आहे. भविष्यात विद्यापीठ आणखी जोमाने प्रगती करेल असा विश्वासही यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर व श्वेता हुल्ले यांनी केले.
---------------------
ही माझ्या आईने दिलेली पदवी.........
मी लहान असतानाच वडीलांच छत्र हरपलं, दोन आया होत्या त्या कालांतराने निधन पावल्या, आता मला आधार नाही. माझी पत्नी हिच माझी आई आहे. मला आजवर भोपाळ, हैद्राबाद येथील विद्यापीठांनी डी.लिट. हि पदवी दिली आहे, मात्र सोलापूर विद्यापीठाने दिलेली डॉक्टरेट (डी.लिट्.) हि पदवी म्हणजे माझ्या जन्मभूमीतील आईने दिलेला सन्मान आहे. आयुष्यात हा क्षण कधीही विसरणार नाही असे भावनीक उद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.
-------------------
राज्यपालाने प्रोटोकॉल तोडला...
वास्तविक पाहता राज्यपालच्या दौऱ्यात त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे भाषण करता येत नाही, मात्र सुशीलकुमार शिंदे यांना डी.लिट्. हि पदवी बहाल केल्यानंतर त्यांना मनोगत व्यक्त करण्याचा मोह आवरला नाही. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी प्रोटोकॉल तोडुन लोकशाहच यश यावर ४ मिनीटाच भाषण केले आणि उपस्थितांना अश्चार्याचा धक्का दिला.
---------------------------
दीक्षांत मिरवणूक...
सोलापूर विद्यापीठाच्या वतीने बुधवारी घेण्यात आलेल्या विशेष दीक्षांत समारंभात दीक्षांत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीच्या समोर परीक्षा नियंत्रक बी.पी.पाटील, मध्यभागी कुलपती चे. विद्यासागर राव, कुलगुरू डॉ. एन.एन.मालदार, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, प्रभारी कुलसचिव पी.प्रभाकर आदी सहभागी झाले होते. मिरवणूक कुलगुरूंच्या दालनापासुन सभागृहापर्यंत काढण्यात आली. मिरवणूकीत सर्वांनी विद्यापीठाचा गाऊन परिधान केला होता.

Web Title: In India's democracy, impossible things are possible: Explanation by the Governor of Vidyasagar Rao, University of Sushilkumar Shindena D. Litt.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.