बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींवर तपासणीआधीच केले जातात औषधोपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:19 AM2021-04-26T04:19:41+5:302021-04-26T04:19:41+5:30

भोसे ग्रामपंचायत कार्यालयात आरोग्य विभाग, शिक्षकांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष ॲड. ...

Individuals in contact with the infected patient are pre-examined with medication | बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींवर तपासणीआधीच केले जातात औषधोपचार

बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींवर तपासणीआधीच केले जातात औषधोपचार

googlenewsNext

भोसे ग्रामपंचायत कार्यालयात आरोग्य विभाग, शिक्षकांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, सपोनि. प्रशांत पाटील, उपसरपंच भारत जमदाडे, अजय जाधव, डॉ. नाईकनवरे, कृष्णात माळी, ग्रामसेवक डी.बी. भुजबळ, भाऊसाहेब देवकर यांच्यासह आरोग्य कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते.

प्रत्येक गावात कोरोना जनजागृती समिती कार्यरत करणे गरजेचे आहे. या माध्यमातून गरजू लोकांना मदत करावी. शिवाय ग्रामीण भागात वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण कमी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सचे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले. पंढरपूरमध्ये नव्याने २०० बेडची क्षमता असलेले रुग्णालय तयार होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोट :::::::::::::::::::

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. प्रत्येक नागरिकाने शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. मोटारसायकलवरून विनाकारण फिरताना दिसल्यास त्याच्यावर कारवाई करून त्याची मोटारसायकल ताब्यात घेऊन ती लॉकडाऊन संपल्याशिवाय त्या व्यक्तीला दिली जाणार नाही.

-प्रशांत पाटील,

सपोनि., करकंब

Web Title: Individuals in contact with the infected patient are pre-examined with medication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.