‘इंद्रायणी’ एक्सप्रेसमधील जीवघेणी घुसखोरी...!
By appasaheb.patil | Published: November 22, 2018 01:57 PM2018-11-22T13:57:28+5:302018-11-22T14:00:45+5:30
वृद्ध मंडळी त्रस्त : पुण्याहून आलेल्या प्रवाशांना उतरूही देत नाहीत
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : वेळ १ वाजून २५ मिनिटे़़़सोलापूररेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर १ वाजून ३५ मिनिटे सोलापूरहून पुण्याला जाणाºया इंद्रायणी एक्सप्रेसची आगमनाची वेऴ १़३६ वाजता इंद्रायणी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येण्यास सुरूवात..रेल्वेच्या हॉर्नचा आवाज सुरू़...जसजशी हॉर्न वाजवित इंद्रायणी एक्सप्रेस प्लॅर्टफॉर्म क्रमांक १ वर येऊ लागते तसतशी रेल्वेच्या विरूध्द दिशेला जाऊन जागा पकडण्यासाठी प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन रेल्वेत प्रवेश करण्यासाठी धडपडीच्या तयारीला लागतात.
अगोदरच आत असलेल्या प्रवाशांना उतरू न देता खालून घुसखोरी करून चढलेले प्रवासी आतील प्रवाशांना दमदाटी करून जागा सोडण्यास भाग पाडतात़ सोमवारी दुपारी १ ते २ वाजेदरम्यान सोलापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे गाडीतून प्रवास करणाºयांची पाहणी केली़ या पाहणीत प्रवाशांचे धोकादायक प्रसंग दिसून आले.
इंद्रायणी एक्सप्रेस जेव्हा सोलापूर स्थानकावरून पुण्याकडे मार्गस्थ झाली, त्यावेळी अनेक प्रवासी डब्याच्या दरवाजाला लटकून प्रवास करणे, धावत्या गाडीत चढणे-उतरणे, गाडी धावत असताना चढणाºया प्रवाशांची धावपळ ही तर खूपच जीवघेणी होती. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने गाड्यांना डब्यांची संख्या वाढवणे गरजेचे तसेच प्रवाशांनी जीवाची पर्वा करून स्वयंशिस्त लावून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
---------------
गाडीतून उतरण्यावरून होतात भांडणे
गाडी पूर्णपणे थांबत नाही, तोच गाडीत चढणारे प्रवासी गेटजवळून धावपळ करायला सुरुवात करतात. एवढेच नव्हे गाडी येण्याआधी दहा ते पंधरा मिनिटे प्रवासी जागा पकडण्यासाठी रेल्वे पटरीच्या विरूध्द दिशेला थांबून धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करतात़ यावेळी गाडी थांबल्यानंतर गाडीतल्या प्रवाशांना खाली उतरू देण्याआधीच चढणारे गोंधळ करतात. त्यामुळे समन्वय साधला जात नाही. अशा वेळी प्रवाशांमध्ये भांडण होतानाचे चित्र दिसून आले़ जो-तो आपापली जागा पकडण्याच्या नादात असल्यामुळे भांडण सोडविण्याचा कोणीच प्रयत्न करीत नसल्याची बाब समोर आली.
------------------
इंद्रायणीचा प्रवास धोकादायक
सोलापूरहून पुण्याला जाण्यासाठी दुपारी २ च्या सुमारास इंद्रायणी एक्सप्रेस आहे़ सध्या दिवाळीचा हंगाम असल्याने सोलापूर रेल्वे स्थानकावर गर्दी दिसून येत आहे़ येणाºया प्रवाशांबरोबर जाणाºया प्रवाशांची गर्दीही तितकीच आहे़ लोकमतच्या सर्वेक्षणात इंद्रायणी एक्सप्रेसला क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असतात. शिवाय जागा मिळावी म्हणून गाडी येण्याच्या १५ मिनिटे आधीच फलाटाविरुद्ध दिशेने दोन रेल्वे रुळाच्या मधोमध उभे राहतात. हा प्रकार अत्यंत धोकादायक आहे पण पोलीस त्यांना साधी हटकण्याची तसदी सुद्धा घेत नाही.
रेल्वे पोलिसांकडून नियमित कारवाई नाही
- रेल्वे सुरक्षा बलाचे जवान स्थानकावर गस्त घालतात. मात्र, ते कुणाला हटकताना दिसून येत नाहीत. कारवाईचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी दोन-तीन महिन्यांतून एकदाच मोठी कारवाई केली जाते. वेगवेगळे नियम मोडणाºया सुमारे २००-३०० लोकांना एकाच वेळी पकडून त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो. मात्र, हीच कारवाई जर नियमितपणे दररोज १०-१५ जणांवर केली, तर पोलिसांचा वचक निर्माण होईल. त्यामुळे कारवाईत सातत्य असणे गरजेचे झाले आहे.
काय आढळले सर्वेक्षणात...
- लोकमतच्या चमूने सोमवारी दुपारी १ ते २ वाजेपर्यंत सोलापूर रेल्वे स्थानकावरील इंद्रायणी एक्सप्रेसच्या गाडीच्या वेळेत सर्वेक्षण केले.
- या गाडीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आढळून आले. सामान्य बोगीची अवस्था खूपच भयानक होती. गाडी स्थानकावर येण्याआधी शेकडो प्रवासी गाडीची वाट पाहत उभे होते. रेल्वे थांबवण्याआधी म्हणजे गाडीची गती कमी होताच अनेक प्रवासी गाडीतून उड्या मारताना दिसले. तसेच गाडी थांबल्यानंतर प्रत्येक प्रवासी गाडीत चढण्याची- उतरण्याची कसरत करताना दिसला.
- सोलापूर स्थानकावर इंद्रायणी एक्सप्रेस साधारणत: १० ते १५ मिनिटे थांबते़ या दहा ते पंधरा मिनिटांत हजारो प्रवासी चढतात व उतरतात़ याचवेळी खाद्यपदार्थ विक्री करणाºयांची मोठी गर्दी असते़ हेच विक्रेते डब्यात सतत ये-जा करतात, डब्यातील प्रवाशांना अरेरावीची भाषा करीत हे खाद्यपदार्थ विक्रेते या डब्यातून त्या डब्यात प्रवेश करीत विक्री करतात़ याचवेळी प्रवाशांकडे असलेल्या सामानांच्या बॅगा इतर प्रवाशांना ये-जा करण्यास अडचण करतात हेही तितकेच खरे़
- रेल्वे स्थानकावर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्थानकावर फिरताना आढळून आले. रेल्वे स्थानकावर उभी राहिल्यानंतर हे कर्मचारी एखाद्या डब्यासमोर जाऊन उभे राहत. त्यांच्या उपस्थितीमुळे फक्त संबंधित डब्यातून चढ-उतार करणारे प्रवाशीच नियंत्रणात होते. इतर डब्यांजवळ मात्र गर्दी आणि गोंधळच पाहायला मिळाला.
- गाड्यांमध्ये खाद्यपदार्थ विक्री करणारे विक्रेतेही धोका पत्करून धावत्या गाड्यांंमध्ये चढ-उतार करतात. विक्रेत्यांसह प्रवाशांनीच एकमेकांना सहाय्य करून सावकाश चढ-उतार केल्यास कदाचित धोकादायक प्रकार थांबतील हे मात्र नक्की़
- अप-डाऊन करणाºयांनीदेखील वेळेचे नियोजन करून वेळेआधी रेल्वे प्लॅटफॉर्मवर आले तर त्यांना धावती गाडी पकडण्याची वेळ येणार नाही. तसेच सध्या गाड्यांंमध्ये प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे कोणत्याही डब्यात प्रवाशांना शिरण्यास जागा नसते. त्यामुळे रेल्वे प्रशासनानेदेखील डब्यांची संख्या वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.