पंढरपूर तालुक्यात म्युकरमायकोसिसचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:24 AM2021-05-20T04:24:16+5:302021-05-20T04:24:16+5:30
पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या २१ हजारांच्या पुढे गेली आहे तर कोरोनामुळे ३८१ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या २१ हजारांच्या पुढे गेली आहे तर कोरोनामुळे ३८१ जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण, त्यांची स्थिती याबाबत आरोग्य विभागाने शोधमोहीम सुरू केली. त्यात पंढरपूर तालुक्यातील सहा संशयित रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे आढळून आले. त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. पंढरपूर तालुक्यात कोरोनामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असताना आता म्युकरमायकोसिसने शिरकाव केल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे.
कोट ::::::::::::::::::::::::::::::::
पंढरपूर तालुक्यात म्युकरमायकोसिचे सहा संशयित रुग्ण आढळून आले आहेत. ते रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना आता सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहेत.
- डॉ. अरविंद गिराम
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर.