परप्रांतीय सलून व्यवसायिकांची घुसखोरी; कुर्डूवाडीत नाभिक बांधवांचे चक्री उपोषण

By काशिनाथ वाघमारे | Published: October 10, 2023 05:54 PM2023-10-10T17:54:41+5:302023-10-10T17:54:54+5:30

कुर्डूवाडी (ता. माढा) शहरात  परप्रांतीय सलून कामगारांची संख्या वाढली असून स्थानिकांच्या व्यवसाय अडचणीत येतोय.

Infiltration of expatriate salon operators Cyclic hunger strike of nuclear brothers in Kurduwadi | परप्रांतीय सलून व्यवसायिकांची घुसखोरी; कुर्डूवाडीत नाभिक बांधवांचे चक्री उपोषण

परप्रांतीय सलून व्यवसायिकांची घुसखोरी; कुर्डूवाडीत नाभिक बांधवांचे चक्री उपोषण

सोलापूर: कुर्डूवाडी (ता. माढा) शहरात  परप्रांतीय सलून कामगारांची संख्या वाढली असून स्थानिकांच्या व्यवसाय अडचणीत येतोय. या परप्रांतीय कामगारांविरोधात सकल नाभिक समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर चक्री उपोषण सुरू केले आहे. आंदोलनापूर्वी मागण्यांचे निवेदन पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांना सकल नाभिक समाजाच्या वतीने देण्यात आले.

या परप्रांतियांची कायदेशीर नोंदी, पोलीस व्हेरीफिकेशन असे अनेक मुद्यांवर त्यांची चौकशी होत नाही. शहरात परप्रांतीय कामगारांनी स्थानिकांच्या सलुन व्यवसायावर केलेल्या अतिक्रमणामुळे  येथील नाभिक समाज बांधव अडचणीत सापडला आहे. बेकायदेशीर वास्तव्यास व व्यवसाय करणा-या परप्रांतियांचे पोलिस व्हेरीफिकेशन करावे आणि त्यांच्यावर नियंत्रण आणावे या मागणीसाठी सकल नाभिक समाजाच्या कार्यकर्त्यांनी चक्री उपोषण सुरू केले आहे. या चक्री उपोषणात कुर्डूवाडी शहरातील सर्व सकल नाभिक समाज यांच्या बरोबरच कूर्डू, लऊळ, भुताष्टे, टेंभुर्णी, मोडनिंब, करमाळा, माढा, व्होळे या गावातील समाजबांधवांनी पाठिंबा दिला आहे.
 

Web Title: Infiltration of expatriate salon operators Cyclic hunger strike of nuclear brothers in Kurduwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.