उजनीतील आवक मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:23 AM2021-09-19T04:23:38+5:302021-09-19T04:23:38+5:30

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरण येत्या आठवड्यात शंभर टक्के भरण्याची अपेक्षा होती; मात्र पुणे जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ...

The inflow in Ujjain slowed down | उजनीतील आवक मंदावली

उजनीतील आवक मंदावली

Next

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरण येत्या आठवड्यात शंभर टक्के भरण्याची अपेक्षा होती; मात्र पुणे जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतलेली आहे. मागील १२ तासात उजनीच्या वरील सर्व १९ धरणावर फक्त ४ मी.मी पावसाची नोंद झालेली आहे. अनेक धरणामधून सोडला जात असलेला विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. परिणामी, पुणे जिल्ह्यातून येणारा पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने आणखी काही दिवस उजनी धरण भरण्याची वाट पहावी लागणार आहे. पुणे बंडगार्डन येथील विसर्ग ४ हजार ८९८ क्यूसेक इतका चालू आहे. तर बंद करण्यात आलेला वीरमधील विसर्ग मध्यरात्री पुन्हा सुरू केला आहे. वीर धरणाच्या सांडव्यातून काल पहाटे दोन वाजता ४६३७ विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

................

उजनी धरणातील पाणीपातळी

एकूण पाणीपातळी - ४९६.०० मीटर

एकूण पाणीसाठा - ३०५०.९४ (१०७.७३टी.एम.सी)

उपयुक्त साठा - १२४८.१३ दलघमी ( ४४.०७टी.एम.सी.)

टक्केवारी - ८२.२७ टक्के

.......

उजनीत येणार विसर्ग

दौंड : ४७२८ क्युसेक

बंडगार्डन :४८९८ क्युसेक

Web Title: The inflow in Ujjain slowed down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.