जिल्ह्यातील गोरबांधवांची बांधणी करणार, अश्विनी राठोड यांची माहिती, बंजारा समाजाची विश्रामगृहावर झाली सहविचार सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 02:04 PM2017-12-28T14:04:36+5:302017-12-28T14:07:05+5:30
गोरमाटी समाजाचा इतिहास, संस्कृती, कडी, कसळात, गीद याविषयी संपूर्ण जिल्हात जनजागृती करणाºयाबरोबरच जिल्ह्यात गोरबांधवांची नव्याने बांधणी करण्यात येणार असल्याची माहिती अश्विनी राठोड यांनी दिली़
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २८ : गोरमाटी समाजाचा इतिहास, संस्कृती, कडी, कसळात, गीद याविषयी संपूर्ण जिल्हात जनजागृती करणाºयाबरोबरच जिल्ह्यात गोरबांधवांची नव्याने बांधणी करण्यात येणार असल्याची माहिती अश्विनी राठोड यांनी दिली़
गोरबंजारा समाजाचे प्रश्न,समस्या तसेच ध्येयधोरण व दिशा यावर चर्चा करण्यासाठी विश्रामगृहावर गोर बंजारा समाजाची सहविचार सभा झाली़ या सभेप्रसंगी राठोड यांची ही माहिती दिली़ प्रारंभी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले़ यावेळी राजू पवार (नेहरू नगर),सचिन चव्हाण(अक्कलकोट), सुरेश राठोड(मुळेगाव तांडा),नवनाथ जाधव (घोडा तांडा सरपंच), डॉ.प्रा.लालसिंग रजपूर (नेहरू नगर), विकास राठोड (बेलाटी तांडा), सुरेश राठोड (मुस्ती तांडा सरपंच), प्रकाश चव्हाण (बोरामणी) आदी मान्यवर उपस्थित होते़
संत सेवालाल जयंतीनिमित्त जिल्हा आयोजन समितीची निर्मिती, जिल्ह्यातील १७३ तांडा भेटी दौरा, गोर धर्म तांडा निहाय बोर्डाची स्थापना, प्रत्येक तांड्यावर श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी प्रोत्साहन आदी विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली़ या बैठकीस सुनिल राठोड (मंद्रुप), महादेव राठोड (मंद्रुप), दिलीप चव्हाण (मंद्रुप), दिपक दादा पवार(मंत्रीचंडक पार्क), अविनाश राठोड (प्रताप नगर), संजय चव्हाण(कवठे तांडा), स्वप्निल चव्हाण, दिलिप चव्हाण, मधूकर राठोड(शंकरनगर), रमेश राठोड(लोकूर तांडा), मच्छिंद्र पवार(लोकूर तांडा), विनोद चव्हाण(कवटे तांडा), मोहन चव्हाण(फताटेवाडी), रमेश चव्हाण (मुस्ती), शिवानंद राठोड(मुस्ती), राजकुमार पवार(नेहरू नगर), नाम पवार, जीवन राठोड (कामतीतांडा) उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण तर आभार सुनिल राठोड यांनी केले.