सोलापुरातील सात अभियांत्रिकी महाविद्यालयाची बाटूसह उद्योगाभिमुख शिक्षणाकडे वाटचाल, कुलगुरू डॉ़ विलास गायकर यांची माहिती
By admin | Published: June 3, 2017 05:48 PM2017-06-03T17:48:49+5:302017-06-03T17:48:49+5:30
-
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ३ - महाराष्ट्र शासनाने या शैक्षणिक वषार्पासून स्वतंत्र तंत्र विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिर्व्हसिटी (बाटू)ची स्थापना येत्या शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून होत आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्रात बाटूची स्थापना २५ वषार्पूर्वीच झालेली आहे. बाटूमधुन बाहेर पडलेले विद्यार्थी आज कापोर्रेट जगतात उच्चस्थानी कार्यरत आहेत, अशी माहिती बाटू विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास गायकर यांनी नागेश करजगी आॅर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, पहिल्या वर्षी एकूण ६३ महाविद्यालयांना बाटूची संलग्नता देण्यात आली. यात ४८ अभियांत्रिकी, ३ आॅकिटेक्चर, १२ फार्मसी महाविद्यालयांचा समावेश आहे. अभ्यासक्रमातील व परीक्षा पध्दतीतील बदल हे बाटू विद्यापीठाचे इतर विद्यापीठांपेक्षा वेगळेपण राहणार आहे. विद्यापीठाचा अभ्यासक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रकरिता एकच असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारेल. अभ्यासक्रमासाठी अभ्यासक्रम समितीमध्ये ५० टक्के इंडस्ट्री स्पेशालिस्ट व ५० टक्के शैक्षणिक तज्ञ यांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे सदर अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख व दजेर्दार ठरेल. यामध्ये प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगवर विशेष भर देण्यात येईल, यासाठी म्हणून विद्यार्थ्यांना सहाव्या सत्रानंतर सहा ते आठ आठवड्यांचे इंडस्ट्रीयल ट्रेनिंग करावे लागेल. आठव्या सत्रात विद्यार्थ्यांना सामाजिक प्रश्नांशी संदर्भ असलेले व इंडस्ट्री स्पॉनसर प्रोजेक्ट करावे लागेल, ज्यामुळे तांत्रिक शिक्षणाचा समाजाला तसेच उद्योग जगताला उपयोग होईल.
बाटूची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे नवीन शिक्षकांना टिचिंग स्कील डेव्हल्प करण्यासाठी दोन आठवड्यांचा वर्कशॉप बंधनकारक असेल तसेच सेवेत असेलेले शिक्षकांना शैक्षणिक कौशल्य अद्ययावत ठेवण्यासाठी दर तीन वर्षांनी इंडस्ट्रीयल ट्रेनिंग अनिवार्य राहील.
परीक्षा पध्दतीतील बदलांवर बोलताना त्यांनी असे नमूद केले की, विद्यार्थ्यांचे कन्टिनिवस असेसमेंट करण्यात येईल, यासाठी ४० टक्के असेसमेंट महाविद्यालय अंतर्गत राहील व ६० टक्के असेसमेंट हे युनिव्हर्सिटीच्या परीक्षेमार्फत केले जाईल.
रोजगाभिमुख शिक्षण पध्दती देताना विद्यार्थ्यांच्या सेंट्रल प्लेसमेंटबाबत ही विद्यापीठ विशेष लक्ष देईल. आता अभियांत्रिकीची पदवी ही बी.ई. किंवा एम.ई. न मिळता बी.टेक/एम.टेक मिळणार आहेत. याचा निश्चितपणे फायदा उच्च शिक्षण तसेच चांगल्या नोकऱ्या मिळण्यासाठी होणार आहे.यावेळी पत्रकार परिषदेस एन.के. आॅर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सचिव एन.एम. पाटील व प्राचार्य डॉ. जे.बी. दफेदार, विद्याविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. जी.के. देशमुख, ए.जी. पाटील इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. एस.ए. पाटील, भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकीचे सचिव रवि गायकवाड, प्राचार्य एम.डी. पाटील, फॅबटेक सांगोलाचे अध्यक्ष भऊसाहेब रूपनर व प्राचार्य प्रा. सर्जे, प्रा. जगताप, भगवंत इन्स्टिट्यूट बाशीर्चे प्रा. मुंढे, श्रीराम इन्स्टिट्यूट पानीवचे प्राचार्य व जनता बँकेचे संचालक महेश अंदेली आदी उपस्थित होते.