इंटरनेटवर माहिती मिळते, ज्ञान नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:22 AM2021-09-13T04:22:02+5:302021-09-13T04:22:02+5:30

लोकमंगल फाउंडेशन आणि लोकमंगल सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित शिक्षकरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ऑनलाइन व्याख्यानात ते बोलत होते. या पुरस्कार ...

Information is available on the internet, not knowledge | इंटरनेटवर माहिती मिळते, ज्ञान नाही

इंटरनेटवर माहिती मिळते, ज्ञान नाही

Next

लोकमंगल फाउंडेशन आणि लोकमंगल सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित शिक्षकरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ऑनलाइन व्याख्यानात ते बोलत होते. या पुरस्कार वितरण सोहळ्याला आ. सुभाष देशमुख, लोकमंगल फाउंडेशनचे उपाध्यक्ष शहाजी पवार, डॉ. आशालता जगताप, डॉ. ह. ना. जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात नऊ शिक्षकांना शिक्षकरत्न पुरस्कार देण्यात आले, तर एका शिक्षकाला डॉ. अब्दुल कलाम पुरस्कार देण्यात आला.

यावेळी आ. देशमुख म्हणाले, शिक्षक हे सोलापूर जिल्ह्याची ताकद आहेत. ते विद्यार्थी घडवण्यासोबतच जिल्ह्याचे चांगले मार्केटिंगसुद्धा करू शकतात. शिक्षकांनी सोलापूर जिल्ह्याचे वैभव वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. २७ सप्टेंबर हा पर्यटन दिन आहे. यानिमित्ताने सर्व शिक्षकांनी सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचे महत्त्व सर्वांना समजेल यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करावेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आशालता जगताप यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. ह. ना. जगताप यांनी करून दिला. सूत्रसंचालन अरविंद जोशी यांनी केले. आभारप्रदर्शन युवराज गायकवाड यांनी केले. यावेळी पुरस्कार विजेत्या शिक्षकांच्या वतीने प्रा. विजय वडेर, मच्छिंद्रनाथ नागरे आणि वनिता जाधव तसेच, नंदू माळी यांनी मनोगत व्यक्त केले.

...............

चौकट

यांना मिळाला पुरस्कार

विलास काळे (अरण), रत्नमाला होरणे (कंदर), वनिता जाधव (शिवणे), अंबू गुळवे (सौंदरे), रामचंद्र जवंजाळ (तळे हिप्परगे), मच्छिंद्रनाथ नागरे (केम), विजय वडेर (सोलापूर), सावता घाडगे (अरण), सुप्रिया शिवगुंड (पिरळे) आणि तानाजी शिंदे (पंढरपूर).

...............

लोकमंगल शिक्षकरत्न पुरस्कार वितरणप्रसंगी आ. सुभाष देशमुख, डॉ. भंडारकर, शहाजी पवार, डॉ. आशालता जगताप, डॉ. ह.ना. जगताप आदी.

........

(१२लोकमंगल)

Web Title: Information is available on the internet, not knowledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.