सोलापुरातील विद्यार्थ्यांची कल्पकता आली समोर; विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेतून साकारले शेकडो प्रयोग

By Appasaheb.patil | Published: February 28, 2023 07:00 PM2023-02-28T19:00:11+5:302023-02-28T19:01:00+5:30

भारताचे सुपुत्र शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी 'इफेक्ट्स ऑफ लाईट 'चा शोध लावला.

Ingenuity of students of Solapur came to the fore; Hundreds of experiments created out of student curiosity | सोलापुरातील विद्यार्थ्यांची कल्पकता आली समोर; विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेतून साकारले शेकडो प्रयोग

सोलापुरातील विद्यार्थ्यांची कल्पकता आली समोर; विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेतून साकारले शेकडो प्रयोग

googlenewsNext

सोलापूर: राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे हायस्कूल च्या वतीने आयोजित विज्ञान प्रदर्शनात दीडशे विद्यार्थी सहभाग होत पन्नास प्रयोग सादर केले. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेतून विविध प्रयोग साकारले होते. 

भारताचे सुपुत्र शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी 'इफेक्ट्स ऑफ लाईट 'चा शोध लावला. त्याची घोषणा त्यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी केली होती. त्या सन्मानार्थ दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. 

नववी इयतेच्या कुमार पिसे, निखिल येमुल, मुकेश गडगी, स्वप्निल गुंडला, रमचरण पद्मा या विद्यार्थ्यांनी हा प्रयोग सादर केला. एका बाटलीतील पाण्यात पेटलेल्या सिगारेटचा धूर सोडून दुसऱ्या छिद्रातून पाणी बाहेर सोडले. बाटलीतील धुरासमोर कागद धरला असता, ते पुर्णतः तपकीरी काळसर झाल्याचे दिसून आले असा परिणाम आपल्या फुफ्फुसावर होतो असे या प्रयोगातून दाखवून दिले आहे.

दरम्यान, आठवी इयतेतल्या चाहत शेख, अंकिता इगे, सुप्रिया पुल्ली या विद्यार्थ्यांनींनी मानवी शरीराच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून अंतर्गत अवयव आणि त्याची कार्ये विषद करून सांगितले. त्यासोबत त्याची निगा कशी राखावी हे सांगितले. शिवाय कमीत कमी विजेवर आणि बॅटरीवर चालणारे हे यंत्र नववीतल्या दिनेश मार्गम, शुभम संगा यांनी तयार केले आहे. एका बाजूने धूर शोषून घेते तर दुसऱ्या बाजूने बाहेर फेकले जाते. एवढेच नव्हे तर प्रिया सामल, आसनी चिटमील, भक्ती गुंडेटी या विद्यार्थ्यांनीनी विजवहनाचे फायदे तोटे प्रयोगातून उलगडून दाखविले.

Web Title: Ingenuity of students of Solapur came to the fore; Hundreds of experiments created out of student curiosity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.