अ‍ॅक्शन प्लॅनद्वारे तपश्चर्या केल्यास जिनिअस बनाल, अविनाश धर्माधिकारी, बार्शीत मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे करिअर मार्गदर्शन मेळावा, सेवा-सुविधा केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 01:06 PM2018-01-15T13:06:02+5:302018-01-15T13:10:46+5:30

स्पर्धा परीक्षा व वैद्यकीय किंवा इंजिनिअरिंगमध्येच करिअर करता येते, असा चुकीचा समज आहे़ परीक्षेतील मार्कावरच बुद्धिमत्ता मोजता येत नाही़ जीवनात यशस्वी होण्यासाठी सुरुवातीला स्वत:ला ओळखा, आपल्याला आवड असलेल्या क्षेत्राची निवड करा

Initiation by Action Plan, made by Geneva, Avinash Dharmadhikari, Career Guidance Meet by Barshi Matrubhoomi Pratishthan, launch of Service-Convenience Center | अ‍ॅक्शन प्लॅनद्वारे तपश्चर्या केल्यास जिनिअस बनाल, अविनाश धर्माधिकारी, बार्शीत मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे करिअर मार्गदर्शन मेळावा, सेवा-सुविधा केंद्राचा शुभारंभ

अ‍ॅक्शन प्लॅनद्वारे तपश्चर्या केल्यास जिनिअस बनाल, अविनाश धर्माधिकारी, बार्शीत मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे करिअर मार्गदर्शन मेळावा, सेवा-सुविधा केंद्राचा शुभारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देप्रत्येक व्यक्तीमध्ये एखादा असामान्य गुण असतो. फक्त तो ओळखता आला पाहिजे - अविनाश धर्माधिकारीकरिअरला स्कोप नसतो तर तो व्यक्तीला असतो़ - अविनाश धर्माधिकारीहलाखीच्या परिस्थितीमुळे राज्यातील एकही रूग्ण उपचाराअभावी दगावू नये, असा संदेश त्यांनी दिला आहे - ओमप्रकाश शेटे


आॅनलाइन लोकमत सोलापूर
बार्शी दि १५ : स्पर्धा परीक्षा व वैद्यकीय किंवा इंजिनिअरिंगमध्येच करिअर करता येते, असा चुकीचा समज आहे़ परीक्षेतील मार्कावरच बुद्धिमत्ता मोजता येत नाही़ जीवनात यशस्वी होण्यासाठी सुरुवातीला स्वत:ला ओळखा, आपल्याला आवड असलेल्या क्षेत्राची निवड करा आणि निवडलेल्या क्षेत्रात प्रतिभावंत होण्यासाठी मनाचा संकल्प करुन अ‍ॅक्शन प्लॅनद्वारे १० हजार तासांची तपश्चर्या करा, असे केल्यास तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात जिनिअस (अजब) बनल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केला.
बार्शी येथील मातृभूमी प्रतिष्ठान संचलित करिअर मार्गदर्शन उपक्रम व सेवासुविधा केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे होते. यावेळी मुख्यमंत्री सहायता कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश शेटे, अविनाश सोलवट, ‘लोकमत’चे संपादक राजा माने, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, सचिव प्रताप जगदाळे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, करिअर मार्गदर्शन उपक्रमाचे अध्यक्ष जयकुमार शितोळे, सेवासुविधा केंद्राचे अध्यक्ष अमित इंगोले उपस्थित होते.
धर्माधिकारी म्हणाले, केवळ पुस्तकी ज्ञानावरच हुशारी अवलंबून नसून जगण्या-वागण्यातील हुशारी व इतरही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये एखादा असामान्य गुण असतो. फक्त तो ओळखता आला पाहिजे. आपल्याला जे सहज जमते व ज्यात आनंद वाटतो, तेच क्षेत्र निवडा असा सल्ला त्यांनी दिला. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहोत ते काम मनापासून व प्रामाणिकपणे करा, तीच खरी देशसेवा व ईश्वराची आराधना आहे. करिअरला स्कोप नसतो तर तो व्यक्तीला असतो़ हे करीत असताना दररोज एक तासभर योग व स्वाध्याय केलाच पाहिजे. आपण जे कार्य करत आहोत, त्या माध्यमातून दु:खितांचे व शोषितांचे अश्रू पुसण्यातच खरा आनंद व जीवनाचे सार्थक आहे. गैरमार्गाने मिळवलेली संपत्ती ही कधीही मार्गी लागत नसते़ मातृभूमी प्रतिष्ठानने सुरू केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत व्हर्च्युअल क्लासरूमची चांगली व्यवस्था येथे उभा करू. पुणे-मुंबईच्या धर्तीवर जसे कोर्स दिले जातात, तसे येथे देऊ अशी ग्वाही दिली़ 
ओमप्रकाश शेटे म्हणाले, मुख्यमंत्री संवेदनशील असून, हलाखीच्या परिस्थितीमुळे राज्यातील एकही रूग्ण उपचाराअभावी दगावू नये, असा संदेश त्यांनी दिला आहे. प्रकरणे तत्काळ मार्गी लागण्यासाठी आपले अधिकार समितीला बहाल करणारे फडणवीस पहिले मुख्यमंत्री आहेत. सहायता निधीच्या तुटपुंजी असलेल्या २५ हजार रुपये रकमेत आपण मुख्यमंत्र्यांकडून वाढ करून घेऊन आता ही तीन लाखांवर केली आहे़ त्यामुळे रुग्णांना शेकडो कोटी रुपये मदत देता आली़ आपण ज्या क्षेत्रात काम करीत असतो, त्या ठिकाणी प्रामाणिकपणे केलेले कामदेखील एक देशसेवाच आहे़ कोणतीही जात, धर्म, पंथ न पाहता मानवता ही एकच जात मानून सर्वसामान्यांना शेकडो कोटी रुपये निधीचे आजपर्यंत वाटप केल्याचे सांगितले. मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे यांनी प्रतिष्ठानने सुरू केलेल्या या उपक्रमास चाणक्य मंडळ परिवाराचीच उपशाखा समजून सहकार्य करावे,अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी उत्कृष्ट बीडीओ म्हणून निवड झाल्याबद्दल प्रमोद काळे यांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलीस उपअधीक्षक विजय कबाडे उपस्थित होते़ सूत्रसंचालन मुकुंदराज कुलकर्णी यांनी केले.
---------------------------
यासाठीच हा प्रयत्न
प्रास्ताविकात मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे म्हणाले, युवकांना करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शन व्हावे, सेवासुविधा केंद्राच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या हेतूने या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवल्याचे सांगितले. करिअर केंद्राच्या माध्यमातून दर महिन्याच्या दुसºया शनिवारी नामवंत व्याख्यात्यांना बोलावून युवकांना मार्गदर्शन केले जाणार असल्याचे सांगितले. 
भारतभर असेच कार्य व्हावे
प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांचे कौतुक करीत मातृभूमी प्रतिष्ठानचे कार्य हे एकदिलाने व प्रामाणिकपणे सुरु आहे़ याबरोबरच जीवनात स्थिरस्थावर झालेल्या माणसांनी एकत्र येऊन समाजासाठी काम करायचे ठरवल्यास किती चांगले काम उभारु शकते हे दाखवून दिले आहे़ अशा प्रकारचे कार्य सर्व भारतभर उभे रहावे, अशी अपेक्षा अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केली़ 

Web Title: Initiation by Action Plan, made by Geneva, Avinash Dharmadhikari, Career Guidance Meet by Barshi Matrubhoomi Pratishthan, launch of Service-Convenience Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.