जखमी झाले; पण २३ गुन्ह्यातील कुख्यात आरोपींना केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:22 AM2021-05-19T04:22:34+5:302021-05-19T04:22:34+5:30

महादेव रंगनाथ पवार (रा. २१, चारी-माळीनगर) व सुरेश नामदेव चव्हाण (रा. संजयनगर-माळेवाडी, ता. माळशिरस) हे संजयनगर येथील एका शेतात ...

Injured; But notorious accused in 23 crimes were arrested | जखमी झाले; पण २३ गुन्ह्यातील कुख्यात आरोपींना केली अटक

जखमी झाले; पण २३ गुन्ह्यातील कुख्यात आरोपींना केली अटक

googlenewsNext

महादेव रंगनाथ पवार (रा. २१, चारी-माळीनगर) व सुरेश नामदेव चव्हाण (रा. संजयनगर-माळेवाडी, ता. माळशिरस) हे संजयनगर येथील एका शेतात असल्याची गुप्त माहिती खबऱ्याकडून अकलूज पोलिसांना मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक अरुण सुगवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. वैभव मारकड, पोलीस उपनिरीक्षक स्वाती कांबळे, एएसआय श्रीकांत निकम, बाळासाहेब पानसरे, बबन साळुंखे, पोहेकाॕॅ मंगेश पवार, विक्रम घाडगे, सुहासा क्षीरसागर, विशाल घाटगे, विश्वास शिनगारे, कैलास मारकड, हरिश्चंद्र पाटील, परमेश्वर ठाकर, पोकाॕॅ. मनोज शिंदे, पोना. सुभाष गोरे, अमोल मिरगणे, निलेश काशिद, वाघमोडे, पोकाॕॅ. प्रवीण हिंगणगावकर, पोकाॕॅ. अमितकुमार यादव, मकसूद सय्यद, क्षीरसागर, कंटोळी यांच्यासह पुरुष व महिला होमगार्ड यांच्या पथकाने संजयनगर येथे आरोपी बसलेल्या घराला घेराव घातला.

पोलिसांनी घेरलेले पाहताच आरोपींनी केळीच्या बागेतून पळायला सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून दोघांना पकडले. या झटापटीत पोहेकाॕॅ. मंगेश पवार व विक्रम घाटगे हे जखमी झाले. सदर चोरट्यांनी सन २००९ पासून अकलूज पोलीस ठाणे हद्दीत एकूण ६, माळशिरस, नातेपुते, बार्शी, इंदापूर, भुम, मुरुम, उमरगा, टेंभुर्णी, वडूज, म्हसवड व यवत पोलीस ठाणे हद्दीत १७ असे एकूण २३ गुन्हे करून फरार झाले होते. अशा कुख्यात गुन्हेगारांना धाडसाने अटक केल्यामुळे अकलूज पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.

Web Title: Injured; But notorious accused in 23 crimes were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.