अन् जखमी मोर निसर्गाच्या सानिध्यात स्थिरावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:22 AM2021-02-10T04:22:25+5:302021-02-10T04:22:25+5:30
निसर्गमित्र व ॲनिमल राहत संस्थेने सांगितले की, आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे, याचाही आज बऱ्याच जणांना विसर पडला आहे. ...
निसर्गमित्र व ॲनिमल राहत संस्थेने सांगितले की, आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे, याचाही आज बऱ्याच जणांना विसर पडला आहे. गादेगांव परिसरातील शिवरस्ता येथे दोन मोर असेच संशयास्पद स्थितीत जखमी आढळून आले. याची माहिती वृक्षमित्र दत्ता बागल व गणेश बागल यांना मिळाल्यानंतर त्यांनी ॲनिमल राहत संस्थेची मदत घेऊन दुखापतग्रस्त मोरांना वैद्यकीय उपचार मिळवून देऊन पुढील उपचारासाठी पशुवैद्यक डाॅ. प्रल्हाद भिसे, फाॅरेस्ट गार्ड पाटील, विकास धनदाडे, माधव पवार यांच्या स्वाधीन केले.
या तातडीच्या उपचारामुळे आपला राष्ट्रीय पक्षी मोराला वाचवण्यात यश आले.
मोराची तस्करी होत असल्याच्या संशय
गादेगाव, भंडीशेगाव, शेळवे, उपरी, वाडीकुरोली परिसरात शेकडो मोरांचे वास्तव्य आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बगळे, मोर, जखमी व मृत अवस्थेत सापडले आहेत. त्यामुळे मोर व इतर पक्षांची शिकार करून तस्करी होत असल्याचा संशय निसर्गमित्रांकडून व्यक्त होत आहे. प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून पशुपक्ष्याचे संगोपन करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी दत्ता बागल, गणेश बागल यांनी केली आहे.
फोटो ओळी ::::::::::::::::::::::::::::
जखमी मोरावर उपचार करून निसर्गाच्या सानिध्यात सोडताना वैद्यकीय अधिकारी, दत्ता बागल, गणेश बागल आदी.