वाझे प्रकरणात माझी कोणतीही चौकशी कराच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:23 AM2021-04-09T04:23:58+5:302021-04-09T04:23:58+5:30

आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही नाव याप्रकरणी जोडले जात आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वाझेप्रकरणी झालेले आरोप फेटाळून ...

Inquire into any of my cases | वाझे प्रकरणात माझी कोणतीही चौकशी कराच

वाझे प्रकरणात माझी कोणतीही चौकशी कराच

Next

आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही नाव याप्रकरणी जोडले जात आहे. त्यानंतर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वाझेप्रकरणी झालेले आरोप फेटाळून लावत याप्रकरणी माझी कोणतीही चौकशी करावी त्यास माझी तयारी आहे, असे खुले आव्हान विरोधकांना दिले आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी

पंढरपुरात आले होते. सकाळी त्यांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आढीव

येथील काळेंच्या फार्महाऊसवर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी

वाझेप्रकरणी खुलासा हा केला.

पवार म्हणाले, वाझे या व्यक्तीला मी कधीही भेटलो नाही. माझे वाझेशी कधी संभाषणदेखील झाले नाही. त्याने माझ्या नावाचा उल्लेख

करण्याचे काहीच कारण नाही. तरीही माझे नाव का घेतले हे मला माहिती नाही. माझे याप्रकरणी नाव आल्याने माझी चौकशी करावी. माझ्यावरील हा आरोप धादांत खोटा आहे. सध्या अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी

करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यात माझीही चौकशी करावी, चौकशीत दूध का दूध

पानी का पानी होईल. विरोधकांकडून जाणूनबुजून

महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही

त्यांनी केला.

आवश्यक तेवढी लस मिळेना

महाराष्ट्राला

जेवढी लस मिळायला पाहिजे तेवढी मिळत नाही. सुरुवातीच्या काळात केंद्राने परदेशात लस पाठवण्याची घाई केली; पण ठीक आहे. ती पण आपलीच भावंडे आहेत. आपल्या देशात तयार होणारी लस आपल्या लोकांना आधी मिळायला पाहिजे, ही आमची मागणी आहे.

बाहेरच्या देशांत लस पाठवण्याऐवजी आता देशातील राज्यांमध्ये मागणीनुसार लस द्यावी. कालच ३५० कोटी लसीचे वाटप केले. त्यामध्ये महाराष्ट्राला ७ लाख ५० हजार लसी मिळाल्या आहेत. ठराविक दिवसात लसीकरण संपावायचे आहे. यासाठी शासकीय व वैद्यकीय यंत्रणा कामाला लावल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

यावेळी पालकमंत्री दत्ता भरणे, आ. संजय शिंदे, कल्याणराव काळे, दीपक साळुंखे, सुरेश घुले, भगीरथ भालके, उमेश पाटील, उत्तम जानकर उपस्थित होते.

Web Title: Inquire into any of my cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.