चौकशी करा पण धमक्या देऊ नका; सुभाष देशमुख यांची टिपण्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 08:00 PM2020-02-22T20:00:52+5:302020-02-22T20:02:26+5:30

भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या चौकशीची चर्चा सुरू; भाजपचे मंगळवारी धरणे आंदोलन

Inquire but do not make threats; Subhash Deshmukh's comment | चौकशी करा पण धमक्या देऊ नका; सुभाष देशमुख यांची टिपण्णी

चौकशी करा पण धमक्या देऊ नका; सुभाष देशमुख यांची टिपण्णी

Next
ठळक मुद्दे- सुभाष देशमुख यांनी केली महाविकास आघाडीवर टिका- भाजप मंत्र्यांच्या चौकशी करीत असाल तर सहकार्य करू - देशमुख- भाजप सरकारने घेतलेले निर्णय रद्द करणे चुकीचेच - देशमुख

सोलापूर : भाजप सरकार मधील मंत्र्यांच्या चौकशीची चर्चा सुरू आहे राज्य सरकारने खुशाल चौकशी करावी केवळ धमक्या देऊ नयेत आमची मन विचलित करण्याचा प्रयत्न करू नये अशी टिप्पणी माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापुरात बोलताना केली.
        भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीने येत्या २५ फेब्रुवारी रोजी राज्यभर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे़ या आंदोलनाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार सुभाष देशमुख यांनी राज्य सरकार करणार असलेल्या कथित चौकशी संदर्भात बोलत होते. ते म्हणाले त्यांनी चौकशी केली पाहिजे चौकशी करण्याच्या धमक्या घेऊन आमची मन विचलित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आम्ही चौकशीला सामोरे जाऊ विनाकरण भीती घालण्याचा प्रयत्न कोणीही करू नये असा सल्लाही त्यांनी दिला.

फडणवीस सरकारने थेट जनतेतून सरपंच नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला होता महाविकास आघाडीच्या सरकारने तो निर्णय रद्द करून ग्रामपंचायत सदस्यातुन सरपंच निवडण्याचे विधेयक सादर केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकºयांना दिलेला मतदानाचा अधिकारही या सरकारने काढून घेतला आहे़ दोन्ही निर्णय चुकीचे असून मूठभर लोकांच्या हाती सत्ता देण्याचे त्यांचे धोरण असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले. जनता त्यांना मत देत नाही मात्र ठराविक लोकांना सांभाळून, प्रसंगी त्यांना पळवून नेता येते आणि सत्ता काबीज करता येते यासाठी हा आटापिटा असल्याचे त्यांनी सांगितले.
      --------
आधी वनखात्याची जमीन ताब्यात घ्या
बोरामणी विमानतळाच्या विकासासाठी राज्य सरकारने ५० कोटी निधीची तरतूद केली आहे याकडे आमदार सुभाष देशमुख यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, आता विमानतळ व्हायला हरकत नाही विमानतळाची नियोजित जमीन वनखात्याची आहे आधी ही जमीन तरी ताब्यात घ्या असा सल्लाही त्यांनी दिला.

Web Title: Inquire but do not make threats; Subhash Deshmukh's comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.