आले ट्रामा केअरच्या पाहणीसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:26 AM2021-09-15T04:26:49+5:302021-09-15T04:26:49+5:30
केली तीन गरोदर महिलांची प्रसूती लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकोट : ट्रामा केअर सेंटर आणि ऑक्सिजन प्लांटची पाहणी करण्यासाठी आलेले ...
केली तीन गरोदर महिलांची प्रसूती
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकोट : ट्रामा केअर सेंटर आणि ऑक्सिजन प्लांटची पाहणी करण्यासाठी आलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या तीन महिलांची अवस्था ओळखली. त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात न पाठवता तातडीने ग्रामीण रुग्णालयातच सिझेरियन शस्त्रक्रिया केली. ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि त्या महिलांच्या नातेवाईकांनी डॉ. ढेले यांच्या प्रयत्नांचे काैतुक केले.
८ सप्टेंबर रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले हे अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर व ऑक्सिजन प्लांट तपासणीसाठी आले होते. दरम्यान, येथील ग्रामीण रुग्णालयात तीन गरोदर महिला प्रसूतीसाठी आल्या होत्या. त्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे डॉ. प्रदीप ढेले यांच्या लक्षात आले. त्यांनी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांच्याकडून माहिती घेतली. त्यांना त्यांच्या वेळेचा आणि स्थितीचा अंदाज आला. त्यांनी तत्काळ अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयातच यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली.
याप्रसंगी भूलतज्ज्ञ डॉ. शिवनगी, डॉ. रोहन वायचळ, डॉ. नीरज जाधव, डॉ. इंदुरकर, डॉ. सतीश बिराजदार, वर्दे, परिचारिका काकडे, नंदे, क्षीरसागर उपस्थित होते.
----
१०अक्कलकोट-ट्रामा केअर