कामांची केली पाहणी, तयार करणार प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:39 AM2021-02-18T04:39:48+5:302021-02-18T04:39:48+5:30

कुर्डूवाडी : आर. आर. आबा सुंदर गाव पुरस्कार योजनेसाठी जिल्ह्यातील तीन गावांची निवड करण्यात आली ...

Inspection of works, preparation of proposals | कामांची केली पाहणी, तयार करणार प्रस्ताव

कामांची केली पाहणी, तयार करणार प्रस्ताव

Next

कुर्डूवाडी : आर. आर. आबा सुंदर गाव पुरस्कार योजनेसाठी जिल्ह्यातील तीन गावांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी भेंड ता. माढा गावचा समावेश आहे. त्यामुळे बुधवारी भेंडला जिल्हास्तरीय निवड समितीने भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. त्यानंतर पुढील पुरस्कारासाठी तसा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.

झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने हा पाहणी दौरा केला. सीईओ स्वामी यांची जिल्हा स्तरीय निवड समिती येताच गामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ढोल-ताश्यांंच्या गजरात स्वागत केले. या जिल्हास्तरीय निवड समितीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, कृषी अधिकारी बेदगुंडे, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अधिकारी कटकधोंड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुर्वे, गट विकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, उपअभियंता शेख, विस्तार अधिकारी रेेपाळ यांचा समावेश होता.

यावेळी जिल्हास्तरीय निवड समितीने येथील विविध खात्यांतर्गत केलेल्या कामाची पाहणी केली. त्यात सॅनिटेशन, मॅनेजमेन्ट, अकाऊंटॅबिलिटी, पर्यावरण, व्हीएसटीएफ अंतर्गत पूर्ण झालेली कामे, सर्व शाळा, अंगणवाडी, अंतर्गत रस्ते, खात्यांंर्गत तपासणी, ग्रामपंचायतची कागदपत्रे, पाणी नमुना अहवाल, शाळा खोली बांधकाम, शालेय गुणवत्ता तपासणी, अद्ययावत सुरू असलेली कामे, सौरऊर्जा, आरोग्य उपकेंद्र तपासणी या विविध कामांंची पाहणी केली. गावात मागील काळात पूर्ण झालेल्या कामांंचा आढावा घेण्यात आला.

ज्ञानेश्वर गायकवाड आणि सरपंच संतोष दळवी यांनी गावची माहिती दिली. आनंद पुजारी यांनी व्हीएसटीएफ कामाबद्दल माहिती दिली. आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप पाटील, शेळके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो

१७ भेंड

ओळी

भेंड गावची आर. आर. आबा सुंदर गाव योजनेत निवड झाल्यानंतर गावच्या पाहणी दौ-याच्या वेळी निवड समितीचे दिलीप स्वामी, चंचल पाटील, अन्य अधिकारी व ग्रामस्थ.

Web Title: Inspection of works, preparation of proposals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.