पावसाच्या अचूक नोंदीसाठी गावांमध्ये पर्जन्यमापक यंत्र बसवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:23 AM2021-07-28T04:23:17+5:302021-07-28T04:23:17+5:30
मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये पर्जन्यमापक यंत्रे बसवावी. यामुळे गावांमधील पावसाची नोंद व्यवस्थित होऊन शेतकऱ्याला योग्य माहिती मिळेल व ...
मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये पर्जन्यमापक यंत्रे बसवावी. यामुळे गावांमधील पावसाची नोंद व्यवस्थित होऊन शेतकऱ्याला योग्य माहिती मिळेल व कोणताही शेतकरी पीक विमा नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही. त्या शेतकऱ्यांना पाऊस होऊन नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीला नुकसानभरपाई द्यावी लागेल. या वेळी त्यांच्या समवेत शहराध्यक्ष हर्षद डोरले, तालुका उपाध्यक्ष रवी गोवे, अर्जुन मुद्गुल, संजय मुद्गुल, अभिजित सावजी आदी उपस्थित होते.
---
फोटो : २७ मंगळवेढा १
270721\img-20210727-wa0019-01.jpeg
फोटो ओळी-मंगळवेढा तालुक्यामधील प्रत्येक गावांमध्ये पर्जन्य मापक यंत्रणा बसवावे या मागणीसाठी तालुका कृषी अधिकारी यांना भेटून निवेदन दिले याप्रसंगी त्यांच्यासमवेत जिल्हा संघटक युवराज घुले शहराध्यक्ष हर्षद डोरले तालुका उपाध्यक्ष रवी गोवे बापू कलुबमे अर्जुन मुद्गुल अभिजीत सांवजी आदी