रथाऐवजी फुलांनी सजवलेल्या चारचाकीतून विठुराया परतले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:25 AM2021-01-16T04:25:16+5:302021-01-16T04:25:16+5:30

विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे येणारा प्रत्येक भाविक विष्णुपद मंदिराला भेट देत असतो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष वद्य अमावस्या या ...

Instead of a chariot, Vithuraya returned in a four-wheeler decorated with flowers ... | रथाऐवजी फुलांनी सजवलेल्या चारचाकीतून विठुराया परतले...

रथाऐवजी फुलांनी सजवलेल्या चारचाकीतून विठुराया परतले...

Next

विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे येणारा प्रत्येक भाविक विष्णुपद मंदिराला भेट देत असतो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष वद्य अमावस्या या काळात महिनाभर विठुरायाचे वास्तव्य याच मंदिरात असल्याची अख्यायिका आहे. त्यामुळे या ठिकाणी महिनाभर दररोज पहाटे व संध्याकाळी विठुरायाची आरती होत असते. याशिवाय विविध धार्मिक कार्यक्रम होतात.

मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर विष्णुपदावरील विठ्ठलाचे वास्तव्य संपुष्टात आले. त्यानंतर पांडुरंगाच्या पादुका मंदिरात आणण्याची परंपरा आहे. प्रतिवर्षी रथातून सवाद्य मिरवणूक काढत विठ्ठलाच्या पादुका मंदिरात आणल्या जातात. परंतु, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रथातून प्रत्यक्ष मिरवणूक न काढता मंदिर समितीच्या चारचाकी या वाहनातून विठ्ठलाच्या पादुका विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आणल्या आहेत.

फोटो

१४पंढरपूर रथयात्रा

ओळी

गोपाळपूर येथील विष्णुपद मंदिरातून पुन्हा मंदिरात विठ्ठलाच्या पादुका या सजवलेल्या चारचाकीतून आणल्या.

Web Title: Instead of a chariot, Vithuraya returned in a four-wheeler decorated with flowers ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.