काँग्रेसने गावागावांत विकासाऐवजी गुंडगिरीचे महापाप पोहोचविले : पालकमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:56 AM2019-03-25T10:56:14+5:302019-03-25T10:59:52+5:30
त्यागी-योगी यांच्यामुळेच सार्वजनिक जीवनात महत्त्व आहे.
अक्कलकोट : गेल्या अनेक वर्षांत अक्कलकोट तालुक्यात विकासाऐवजी प्रत्येक गावागावांत गुंडगिरी पोहोचविण्याचे महापाप येथील लोकप्रतिनिधींनी केल्याचा आरोप पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केला.
ते अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. व्यासपीठावर डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, नागणसूर मठाचे श्रीकंठ महास्वामी, मैंदर्गी मठाचे नीलकंठ महास्वामी, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अक्कलकोट नगराध्यक्षा शोभा खेडगी, दुधनीचे भीमाशंकर इंगळे, सचिन कल्याणशेट्टी, सुरेखा होळीकट्टी, दत्तात्रय तानवडे, आनंद तानवडे, मंगल कल्याणशेट्टी, अण्णप्पा बाराचारी, प्रभाकर मजगे, तुकाराम बिराजदार, रामप्पा चिवडशेट्टी, मल्लिनाथ स्वामी, चंद्र्रकांत इंगळे, यशवंत धोंगडे आदी होते.
पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले, मूलभूत सुविधा देण्याऐवजी गावागावांत गुंडगिरी पोहोचविण्याचे महापाप करणाºयांना खड्यासारखे बाजूला सारा. भाजपा कार्यकर्त्यांना धक्का लागल्यास खपवून घेतले जाणार नाही.
नागणसूरचे श्रीकंठ महास्वामी म्हणाले, चौकीदार चोर नसून ते चोरांना देशाबाहेर काढत आहेत. त्यागी-योगी यांच्यामुळेच सार्वजनिक जीवनात महत्त्व आहे. जिल्हाध्यक्ष शहाजी पवार म्हणाले, सुशीलकुमार शिंदे मागच्या वेळेप्रमाणे यंदाही शेवटची निवडणूक सांगत रिंगणात येत आहेत. आता कार्यकर्त्यांनीच सर्जिकल स्ट्राईक करावे. सचिन कल्याणशेट्टी यांनीही मार्गदर्शन केले. महेश हिंडोळे, सुरेखा होळीकट्टी, आनंद तानवडे, यशवंत धोंगडे आदींचे मनोगत झाले. बाळासाहेब मोरे, आलम कोरबू, महेश पाटील, अप्पू परमशेट्टी, बसलिंगप्पा खेडगी यांच्यासह सरपंच, उपसरपंच, चेअरमन, गावकरी उपस्थित होते. संचालन शिवशरण जोजन यांनी तर आभार मोतीराम राठोड यांनी मानले.