बार्शीच्या एमआयडीसीसाठी १५ दिवसांत अहवाल देण्याच्या उद्योग राज्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:30 AM2021-06-16T04:30:40+5:302021-06-16T04:30:40+5:30
बार्शी शहरात मोठी प्रमुख बाजारपेठ आहे; परंतु एमआयडीसी मध्ये भूखंडाचे दर जास्त असल्याने उद्योजकांचा प्रतिसाद मिळत नाही. म्हणून जागेचे ...
बार्शी शहरात मोठी प्रमुख बाजारपेठ आहे; परंतु एमआयडीसी मध्ये भूखंडाचे दर जास्त असल्याने उद्योजकांचा प्रतिसाद मिळत नाही. म्हणून जागेचे दर कमी करण्यासंदर्भात बैठकीत प्रमुख मागणी करण्यात आली. त्यासंदर्भात तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वरील सूचना केल्या.
या बैठकीत बोलताना एमआयडीसी भागात मूलभूत सुविधा आहेत; परंतु पाणी उपलब्ध नाही. एमआयडीसीच्या मागणीनुसार बार्शी नगरपालिकेने अल्पदरात पाणीपुरवठा देण्याचे मान्य केले आहे. तसेच नवीन वीज उपकेंद्राची उभारणी प्रस्ताव महावितरण कंपनीस दिलेला आहे. तो तात्काळ मंजूर करावा. तसेच येथील भूखंडाचे दर कमी करण्याचीही मागणी आमदार राऊत आणि खा. निंबाळकर यांनी यावेळी केली.
या बैठकीस खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. राजेंद्र राऊत, माजी मंत्री दिलीप सोपल, एमआयडीसीचे सहमुख्यकार्यकारी अधिकारी मुंबई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रादेशिक अधिकारी, कार्यकारी अभियंता सोलापूर, सांगली आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
----
क्रीडा संकुलासाठी पाच कोटींची मागणी
बार्शी शहरातील क्रीडा संकुलाच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली. या मागणीला मंत्री तटकरे यांनी सकारात्मकपणे प्रतिसाद देऊन क्रीडा संकुलाच्या विकासासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे सूचना संबंधितांना केल्या.
----
आजी-माजी एकत्र
बार्शीच्या राजकारणात आमदार राजेंद्र राऊत आणि माजी मंत्री दिलीप सोपल या दोघांत गेल्या वीस वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत सामना रंगत आहे. पूर्वी हे दोघे कार्यक्रमाच्या निमित्तानेही एकत्र येण्याचे टाळायचे. गेल्या काही वर्षांपासून महत्त्वाच्या बैठकीच्या निमित्ताने एकत्र येतात. मात्र, त्यांच्यात थेट संवाद कधी होत नाही. या एमआयडीसीच्या बैठकीच्या निमित्ताने हे दोन कट्टर विरोधक विकासाच्या कामाच्या निमित्ताने एकत्र आले. ही बार्शीकरांसाठी भाग्याची गोष्ट आहे. विशेष म्हणजे आमदार राजेंद्र राऊत यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून हा फोटो शेअर केला आहे.
----
===Photopath===
150621\fb_img_1623755049808.jpg~150621\fb_img_1623755055329.jpg
===Caption===
मुंबईत आजी-माजी आमदार व खासदारांच्या उपस्थितीत पार पडली बैठक~मुंबईत आजी-माजी आमदार व खासदारांच्या उपस्थितीत पार पडली बैठक