होमगार्डना अपुरे मानधन.. दोन-तीन महिन्यांनी होते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:17 AM2021-05-28T04:17:33+5:302021-05-28T04:17:33+5:30
वाढती लोकसंख्या व वाढती गुन्हेगारी यामुळे पोलीस प्रशासनावर खूप ताण असतो आणि हा ताण थोडा का होईना, कमी करण्याचे ...
वाढती लोकसंख्या व वाढती गुन्हेगारी यामुळे पोलीस प्रशासनावर खूप ताण असतो आणि हा ताण थोडा का होईना, कमी करण्याचे काम होमगार्ड करीत आहेत. मग ते ट्रॅफिक कंट्रोल करण्याचे काम असो की, व्हीआयपी बंदोबस्त करण्याचे काम असो, आताच्या कोरोनाच्या काळात कोविड केअर सेंटरवर सेवा देण्याचे काम असो, होमगार्ड स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कुठल्याही सुविधा नसताना व मानधन वेळेवर मिळत नसताना, तो इमानेइतबारे कोरोना योद्धा म्हणून आघाडीवर काम करत आहे. त्याच्या निष्काम सेवेची दखल शासनाने घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
----
वेळेवर मानधन अन् नियमित काम हवे
सोलापूर जिल्ह्यात १,९०० हामगार्ड कार्यरत आहेत. होमगार्डला एक वेळ आठ तासांचे ६७० रुपये मानधन दिले जाते. तेही तीन ते चार महिने मिळत नाही. भविष्यनिर्वाह निधी, प्रॉव्हिडंड फंड, आरोग्यासाठी कामगार विमा योजना, गटविमा यासह अन्य योजना लागू करणे आवश्यक आहे, शिवाय कारागृह, रेल्वे, एसटी, अग्निशमन, शासकीय कार्यालये या ठिकाणी कामे नियमित कामे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
---
होमगार्डची निष्काम सेवा असून, अपुरे मानधन, अपुरी साधनसामग्री असताना, त्या परिस्थितीमध्ये होमगार्ड काम करत आहेत. त्यांना शासनाने व समाजाने मानसन्मान द्यावा.
- सचिन जव्हेरी, तालुका समादेशक
----
२६करमाळा-होमगार्ड
करमाळ्यातील सुभाष चौकात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहनधारकांची चौकशी करताना होमगार्ड पथक.
----