बँकेत अपुरी जागा; ग्राहक रस्त्यावर लावतात रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:21 AM2021-05-10T04:21:32+5:302021-05-10T04:21:32+5:30
एवन चौकातील बँकेची जागा तशी अपुरी. ग्राहकसंख्या फार मोठी आहे. सध्या स्टेट बँकेनंतर याच बँकेत दिवसभर गर्दी असते. ...
एवन चौकातील बँकेची जागा तशी अपुरी. ग्राहकसंख्या फार मोठी आहे. सध्या स्टेट बँकेनंतर याच बँकेत दिवसभर गर्दी असते. बँकेच्या या इमारतीसाठी किमान दोन हजार स्क्वेअरफूट जागेची आवश्यकता आहे. सध्याची इमारत ही जवळपास सहाशे स्क्वेअर फुटात आहे. रांगेत केवळ वीस ते पंचवीस खातेदाराच थांबू शकतील अशी स्थिती आहे. विशेषतः महिलांनावर्गाला याचा फार मोठा त्रास होत आहे. बँकेची जुनी जागा याहूनही मोठी होती. सध्या अपुरी जागा निवडली कशी, असा प्रश्न खातेदारांनी केला आहे.
कोरोनाच्या काळात बँकेच्या व्यवहारासाठी ग्राहकांना चक्क रस्त्यावर रांग लावावी लागत आहे. समोरच मोठा रस्ता आहे. या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ असते. अनेकदा अपघाताचे प्रसंग अनुभवावे लागले आहेत. बँकेसाठी जागा वाढवून मिळवावी अन्यथा ही बँक अन्यत्र हलवावी, अशी मागणी सर्वसामान्यातून होत आहे.
--
बँकेची जागा अपुरी आहे. वाढीव जागेसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवला आहे. ग्राहकांना सेवा देत असताना त्यांच्या सुरक्षिततेचाही विचार करावा लागणार आहे. लवकरच प्रस्ताव मंजूर होईल.
- शरणप्पा पुजारी, शाखा अधिकारी, अक्कलकोट
---
बँक ऑफ इंडियाशी आर्थिक व्यवहार करताना अनेक अडचणींना तोंड देतोय. जागा फार अपुरी आहे. यामुळे बँकेत सुरक्षित राहवून व्यवहार करता येत नाही. जागेअभावी रस्त्यावर थांबावे लागते. कोरोना काळात गर्दी होत आहे.
- प्रेमनाथ राठोड
ग्राहक
---
०९ अक्कलकोट
बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना जागेच्या अपुरेपणामुळे अशी गर्दी करावी लागत आहे.