सांगोला तालुक्यातील ३९ शेतकऱ्यांना २० लाखांचा विमा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:23 AM2021-04-01T04:23:24+5:302021-04-01T04:23:24+5:30

गेल्या काही वर्षांपासून पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. आता पहिल्या टप्प्यात जमा झालेल्या पीक विम्यात अक्कलकोट (४७१२ ...

Insurance of Rs 20 lakh sanctioned to 39 farmers in Sangola taluka | सांगोला तालुक्यातील ३९ शेतकऱ्यांना २० लाखांचा विमा मंजूर

सांगोला तालुक्यातील ३९ शेतकऱ्यांना २० लाखांचा विमा मंजूर

Next

गेल्या काही वर्षांपासून पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. आता पहिल्या टप्प्यात जमा झालेल्या पीक विम्यात अक्कलकोट (४७१२ शेतकऱ्यांना २ कोटी ४३ लाख), बार्शी (४१०४ शेतकऱ्यांना २८ कोटी), करमाळा (२५७ शेतकऱ्यांना १३ लाख, माढा (१८२ शेतकऱ्यांना १८ लाख), माळशिरस (९७ शेतकऱ्यांना ४० लाख), मंगळवेढा (१९४१ शेतकऱ्यांना १ कोटी), मोहोळ (६३७ शेतकऱ्यांना १ कोटी), पंढरपूर (१२ शेतकऱ्यांना १० लाख), सांगोला (३९ शेतकऱ्यांना २० लाख), उत्तर सोलापूर (१४५२ शेतकऱ्यांना १ कोटी २५ लाख), दक्षिण सोलापूर (८९७ शेतकऱ्यांना १ कोटी) तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा मंजूर झाला आहे.

दुसऱ्या टप्प्यात ८ हजार १९९ शेतकऱ्यांपैकी ६४८९ शेतकऱ्यांचा विमा मंजूर झाला आहे. यापोटी ४ कोटी ४६ लाख रुपयांचा विमा रक्कम मिळणार आहे, असे सांगण्यात आले. खरीप पीक विम्याच्या नुकसानभरपाईत पात्र शेतकऱ्यांना विमा रकमेचे वाटपही सुरू झाले आहे. आता ४७ हजार ५३१ शेतकऱ्यांना हा विमा मंजूर झाला. पण काही तांत्रिक कारणे आणि पुरेशा कागदपत्रांअभावी ८ हजार ३२० अर्ज विम्याच्या लाभासाठी अपात्र ठरल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Insurance of Rs 20 lakh sanctioned to 39 farmers in Sangola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.