आशावर्कर अंगणवाडीसेविकांचा उतरविला विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:17 AM2021-05-29T04:17:40+5:302021-05-29T04:17:40+5:30
दररोज घरोघरी ‘वाड्या- वस्त्यांवर जाऊन सर्व्हे करणे, कोविड लसीकरण करणे, कोरोना रॅपिड टेस्ट करणे, ही कामे करावी लागत होती. ...
दररोज घरोघरी ‘वाड्या- वस्त्यांवर जाऊन सर्व्हे करणे, कोविड लसीकरण करणे, कोरोना रॅपिड टेस्ट करणे, ही कामे करावी लागत होती. ही कामे करत असताना कोरोना महामारीच्या काळात एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला संरक्षण म्हणून विमा पॉलिसी देण्यात आली.
यावेळी आशा वर्कर भारती नगूरकर सुमन कुंभार वंदना कादे, अंगणवाडीसेविका सुनंदा कादे, जयश्री चिकणे, शीतल मोटे, डांगे, कुलकर्णी या आठ माहिलांना मोहोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश मोरे यांच्या हस्ते विमा पॉलिसी प्रमाणपत्र वाटप केले. याप्रांसगी उद्योगपती विजयकुमार कादे, युवराज कादे, ग्रामसेवक मानसिंग जाधव, सरपंच डॉ. प्रियांका खरात, डॉ. गणेश खरात, दिनकर कादे, उत्कर्ष मोटे, दत्तात्रय धनवे, हनुमंत कादे उपस्थित होते.
---