Intarview; लघुपटांच्या माध्यमातून सोलापूरचे सकारात्मक रूप जगासमोर आणावे : उमेश कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 01:09 PM2019-03-01T13:09:43+5:302019-03-01T13:18:12+5:30
सोलापूर : सोलापूरच्या संस्कृतीचा प्रचार, प्रसार करण्यासाठी शॉर्टफिल्म हे उत्तम माध्यम असून, एखाद्या कल्पनेच्या आधारे सोलापूरचे सकारात्मक रूप जगासमोर ...
सोलापूर : सोलापूरच्या संस्कृतीचा प्रचार, प्रसार करण्यासाठी शॉर्टफिल्म हे उत्तम माध्यम असून, एखाद्या कल्पनेच्या आधारे सोलापूरचे सकारात्मक रूप जगासमोर आणावे. त्याआधारे शॉर्टफिल्म हे सोलापुरातील तरुणांना नव्या उंचीवर घेऊन जाणारे माध्यम ठरेल, असा विश्वास प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला.
सोलापूर सोशल फाउंडेशनने आयोजित केलेल्या शॉर्टफिल्म कार्यशाळेत युवा कलावंत, दिग्दर्शकांना मार्गदर्शन कार्यक्रमानंतर ते बोलत होते़ याप्रसंगी सोलापूर सोशल फाउंडेशनचे सल्लागार प्रा. देवानंद चिलवंत, प्रा. नरेंद्र काटीकर, शोभा बोल्ली, लोकमंगल बँकेचे मुख्य व्यवस्थापक दिनकर देशमुख, डॉ. संध्या रघोजी, डॉ. शिरीष देखणे, दत्तात्रय चौगुले, श्रीकांत माळगे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना दिग्दर्शक उमेश कुलकर्णी म्हणाले की, शॉर्टफिल्म हा अगदी कमी खर्चात तयार होणारे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे अनेक गोष्टी सांगण्यासाठी आपण तंत्रशुद्ध शॉर्टफिल्म शिकण्यासाठी काय काय करावे लागते याबाबत सांगितले़ अनेक वैशिष्ट्यांनी सोलापूर जिल्ह्याचे नाव देशभरात प्रसिद्ध आहे. सोलापूरची खास ओळख असणाºया या गोष्टी जगभरात पोहोचल्या आहेत. त्याचे डिजिटल मार्केटिंग होण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरत आहे, असेही ते म्हणाले.
सोलापूरचे सकारात्मक चित्र समोर आणणे गरजेचे आहे. सोलापूरातला तरुण सोलापुरात रहावा यासाठी नवनव्या गोष्टी समोर आणाव्या लागतात. डिजिटल मीडिया हेच त्याचे उत्तम पर्याय असल्याने शॉर्टफिल्म स्पर्धा आयोजित केली आहे, असेही ते म्हणाले. सोलापूरच्या विविध वैशिष्ट्यांचा ठसा डिजिटल माध्यम, सोशल मीडिया द्वारे जगासमोर येण्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने एक शॉर्टफिल्म स्पर्धा घेतली जाणार आहे. यामध्ये विविध अंगांनी सोलापूरचे सकारात्मक रूप समोर यावे हाच या स्पर्धेचा उद्देश आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.