दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करणार : धैर्यशील मोहिते-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:16 AM2021-07-04T04:16:32+5:302021-07-04T04:16:32+5:30

अकलूज येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर २२ जूनपासून साखळी उपोषण सुरू आहे. आजच्या उपोषणास धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह ग्रा.पं. सदस्य संजय साठे, ...

Intense agitation if not noticed: patient Mohite-Patil | दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करणार : धैर्यशील मोहिते-पाटील

दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करणार : धैर्यशील मोहिते-पाटील

Next

अकलूज येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर २२ जूनपासून साखळी उपोषण सुरू आहे. आजच्या उपोषणास धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह ग्रा.पं. सदस्य संजय साठे, किशोर राऊत, माळेवाडीचे सरपंच जालिंदर फुले, उपसरपंच अरुण खंडागळे, संग्रामनगरचे सरपंच कमाल शेख, उपसरपंच यशवंत साळुंखे, माजी सदस्य चंद्रशेखर दोशी, राहुल जगताप, विशाल फुले, दीपक खंडागळे, विशाल मोरे, दादा तांबोळी सहभागी झाले होते. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन विचारपूस केली.

उपोषणात आज नाभिक संघटनेचे कार्याध्यक्ष रघुनाथ देवकर, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष विजय कुलकर्णी, फुटवेअर असोसिएशन, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील गाळेधारक संघटना, अकलूज शहर झेरॉक्स असोसिएशन, अखिल भारतीय राजपूत युवक आघाडी, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, राजे युवा प्रतिष्ठान, सिद्धिविनायक मित्रमंडळ, दक्षिण भारतीय सेल, एस.बी. ग्रुप या संघटनांनी पाठिंबा दिला.

Web Title: Intense agitation if not noticed: patient Mohite-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.