तीर्थक्षेत्रांना जोडणा-या अंतर्गत चाळण झालेली रस्ते अक्कलकोटच्या उत्तर भागासाठी ठरताहेत जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:24 AM2021-08-15T04:24:26+5:302021-08-15T04:24:26+5:30

चपळगाव : अक्कलकोट आणि तुळजापूर या दोन तीर्थक्षेत्रांना जोडणा-या ४० किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाने वेग घेतला आहे. मात्र, ...

Internally paved roads connecting pilgrimage sites lead to deaths in the northern part of Akkalkot | तीर्थक्षेत्रांना जोडणा-या अंतर्गत चाळण झालेली रस्ते अक्कलकोटच्या उत्तर भागासाठी ठरताहेत जीवघेणी

तीर्थक्षेत्रांना जोडणा-या अंतर्गत चाळण झालेली रस्ते अक्कलकोटच्या उत्तर भागासाठी ठरताहेत जीवघेणी

Next

चपळगाव : अक्कलकोट आणि तुळजापूर या दोन तीर्थक्षेत्रांना जोडणा-या ४० किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाने वेग घेतला आहे. मात्र, अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागातील गावांना एकमेकांशी जोडणारे रस्ते मात्र खराब झाले आहेत. अक्कलकोट-तुळजापूर हा रस्ता हायटेक असला तरी अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न मात्र जीवघेणा ठरत आहे.

याबाबत तालुकावासीयांमधून यापूर्वी गा-हाणी मांडली गेली आहेत. सध्या सुरू असलेल्या रस्त्याची चार टप्प्यांत कामे सुरू आहेत. उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यास जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. अक्कलकोट तालुक्यातील या रस्त्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. ४० किलोमीटरपैकी ३८ किलोमीटरचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा तर दोन किलोमीटरचा रस्ता डांबरीकरणाने तयार होत आहे. या कामात सहा छोटे पूल आणि ७० सीडी वर्क, ६ छोटे पूल बॉक्स आणि पाइप कन्व्हर्ट आदींचा समावेश आहे. अक्कलकोट-नळदुर्ग-तुळजापूर हा रस्ता जरी हायटेक होत असला तरी अनेक गावांना जोडणारे अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने संबंधित खात्याने तत्काळ रस्ते बांधणीचे काम हातात घेण्याची मागणी सर्वसामान्यातून होत आहे.

-----

जीवघेणे रस्ते

डोंबरजवळगे - बोरेगाव, चपळगाव-चपळगाववाडी-हालहळ्ळी-कर्जाळ, तीर्थ-चपळगाव, बावकरवाडी-कुरनूर, दहिटणे-सिंदखेड, बऱ्हाणपूर-डोंबरजवळगे, तीर्थ-डोंबरजवळगे, हन्नूर-डोंबरजवळगे, हन्नूर-चुंगी-किणी, बऱ्हाणपूर-वडगांव-दिंडूर यासह अनेक अंतर्गत रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

----

अक्कलकोट-तुळजापूरचा रस्ता भविष्यात दळणवळणासाठी वरदान ठरणार आहे. ही बाब खरी असली तरी तालुक्याच्या उत्तर भागातील रस्त्याची चाळण झाली आहे. अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत. या रस्त्यांची दुरुस्ती संबंधित विभागाने करणे गरजेचे आहे.

- उमेश पाटील

माजी सरपंच, चपळगाव

----

फोटो : १४ चपळगाव

तीर्थक्षेत्रांना जोडणा-या अंतर्गत चाळण झालेली रस्ते अक्कलकोटच्या उत्तर भागासाठी जीवघेणी ठरताहेत

110821\252903065531img-20210707-wa0022.jpg

अक्कलकोट तालूक्याच्या उत्तर भागातील रस्त्यांची वाट लागल्याचे छायाचित्रातुन दिसत आहे..

Web Title: Internally paved roads connecting pilgrimage sites lead to deaths in the northern part of Akkalkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.