‘आधार एक बदल’ लघुपटाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:17 AM2021-07-15T04:17:05+5:302021-07-15T04:17:05+5:30
पटवर्धन कुरोली : ‘आधार एक बदल’ या लघुचित्रपटाने इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये यश मिळवले. या लघुचित्रपटाला औरंगाबाद येथील रोशनी इंटरनॅशनल शॉर्ट ...
पटवर्धन कुरोली : ‘आधार एक बदल’ या लघुचित्रपटाने इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये यश मिळवले. या लघुचित्रपटाला औरंगाबाद येथील रोशनी इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचा सिनेमॅटोग्राफर हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
या लघुचित्रपटात सामाजिक संदेश देण्यात आलेला आहे. आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना एखादा आयएएस अधिकारी कशाप्रकारे मदत करू शकतो. हे या लघुचित्रपटात दाखवून दिले आहे. या लघुचित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन आणि प्रोडक्शन पिराची कुरोली (ता.पंढरपूर) येथील मारुती तुकाराम नाईकनवरे यांनी केले आहे. या चित्रपटात अंबिका जावीर, रेश्मा नाईकनवरे, नयन लोखंडे, राहुल मस्के, स्वप्नाली तुपसुंदर, बंडू नाईकनवरे, उत्तम साठे यांनी भूमिका साकारल्या आहेत. या अगोदर लघुचित्रपटास मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे दोन पुरस्कारही मिळाले आहेत. त्यामुळे ‘आधार एक बदल’ या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.
----