Interview; देशात देशविरोधी-संस्कृतीविरोधी शक्ती बाहेरच्यांनी पोसून ठेवलेल्या आहेत : किशोरजी व्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 03:14 PM2019-02-18T15:14:57+5:302019-02-18T15:17:28+5:30
गोपालकृष्ण मांडवकर आचार्य किशोरजी व्यास यांचा सोलापुरात कार्यक्रम सुरु असतानाच तिकडे जवानांवर दहशतवादी हल्ला झाला. धर्म-अध्यात्मासोबतच देशातील सध्यस्थितीबद्दल भाष्य ...
गोपालकृष्ण मांडवकर
आचार्य किशोरजी व्यास यांचा सोलापुरात कार्यक्रम सुरु असतानाच तिकडे जवानांवर दहशतवादी हल्ला झाला. धर्म-अध्यात्मासोबतच देशातील सध्यस्थितीबद्दल भाष्य करणाºया या संताने हल्ल्याच्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. देशातील युवा वर्गाकडूनही त्यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतीत अपेक्षा व्यक्त केल्या.
प्रश्न : देशातील अंतर्गत सुरक्षेसंदर्भात आपणास काय वाटते?
उत्तर : देशात सुशिक्षित वर्ग वाढला हे खरे आहे, मात्र यातील एका वर्गाच्या मनात राष्टÑविरोधी भावना निर्माण करण्यात आल्या आहेत. देशातील अध्यात्म आणि संस्कृती भिन्न असली तरी देशाचे संरक्षण सर्वांनी मिळून करण्याची गरज आहे. त्यात मतभेद नको. तिकडे सैनिकांवर हल्ला झाल्यावर टिष्ट्वटरवर पडलेल्या आनंदाच्या आणि अभिनंदनाच्या पोस्ट पाहून मी बेचैन झालो. याचा अर्थ देशात देशविरोधी-संस्कृतीविरोधी शक्ती बाहेरच्यांनी पोसून ठेवलेल्या आहेत, हे स्पष्ट दिसते.
प्रश्न : हे कसे रोखायला हवे?
उत्तर : देशातील एक सुशिक्षित वर्ग परक्यांचा धार्जिणा आहे. तो अशी कामे करतो. त्यामुळे राष्टÑावर निष्ठा असलेल्या शक्तींनीच समर्थ व्हावे. उघडपणे वैचारिक छात्रवृत्ती स्वीकारावी. या निष्ठावानांनी अशा विचारांचे साधार खंडन करावे. राजीव मल्होत्रा, डेव्हिड फ्राऊली, सुब्रह्मण्यम स्वामी, चारुदत्त आफळे ही मंडळी उत्तम काम करीत आहेत. युवा पिढीने व्यसनांपासून दूर राहावे. आपले जीवन आपल्यासाठी नसून परिवार, समाज, मोठ्या ध्येयाकरिता असल्याचा भाव रुजावा आणि सेवावृत्ती वाढावी.
प्रश्न : अध्यात्म आणि मेडिटेशनमधून यावर मार्ग कसा शोधता येईल ?
उत्तर : अलीकडे सर्वांचे मन सैरभैर झाले आहे. मन एकाग्र असेल तर तणाव राहत नाही. अध्यात्माचा संबंध मनाशी व त्या अनुषंगाने देहाशी असतो. मेडिटेशनमुळे मनाची एकाग्रता वाढते, तणाव दूर होतो. योग हे अध्यात्माचे अंगच. अलीकडेच रात्रंदिवस धावपळ व असुरक्षिततेची भावना प्रचंड वाढली आहे. या स्थितीत अध्यात्माला अर्थात योगाला पर्याय नाही.
राममंदिर व्हावेच
राममंदिर होणे नितांत आवश्यक आहे. निर्मितीच्या कामात आधीपासून ज्यांनी भाग घेतला त्यांच्याकडूनच होणे आवश्यक आहे. मात्र आक्रस्ताळेपणा करून चालणार नाही. विद्यमान सरकार अनुकूल आहे. सुप्रिम कोर्टाकडून आम्हाला आशा होती. मात्र त्यांनी विलंब केला आहे. तरीही काही महिने प्रतीक्षा करायला हवी.
वेदांग, वेदार्थ आणि वेदांत
भारतीय संस्कृतीचे मूळ वेदात आहे. तो टिकून राहावा यासाठी महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानने ३४ वेद विद्यालये देशभर स्थापन केलीत. या सर्व विद्यालयांचे केंद्रीय महाविद्यालय आळंदीत सुरू करीत आहोेत. वेदांग, वेदार्थ आणि वेदांत अशा तीन अंगांचे प्रशिक्षण यात मिळेल. तिथे संशोधनकार्यही चालेल. लोकांच्या जीवनात उतरावे यासाठी प्रचारकांचे निर्मिती कार्य होईल. हे सर्वांसाठी मुक्तद्वार असेल. फेब्रुवारी २०२० पर्यंत प्रकल्प पूर्ण होऊन एप्रिलपासून कार्य सुरु होईल.