Interview ; शास्त्रोक्त पद्धतीने ऊस शेती केल्यास १०० टनापेक्षा जास्त अॅव्हरेज हमखास मिळेल : संजीव माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 07:16 PM2019-02-16T19:16:11+5:302019-02-16T19:17:16+5:30
पंढरपूर : जमिनीची सुपिकता, लागवडीची योग्य पद्धत, रासायनिक खतांची मात्रा, पाण्याचे व्यवस्थापन आणि पीक संरक्षण या पंचसूत्रीचा वापर शास्त्रोक्त ...
पंढरपूर : जमिनीची सुपिकता, लागवडीची योग्य पद्धत, रासायनिक खतांची मात्रा, पाण्याचे व्यवस्थापन आणि पीक संरक्षण या पंचसूत्रीचा वापर शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास एकरी १०० टनापेक्षा जास्त अॅव्हरेज हमखास मिळेल, असा विश्वास कृषिभूषण संजय माने (आष्टा, जि़ सांगली) यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला.
‘लोकमत’च्या वतीने पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आयोजित ‘लोकमत अॅग्रोत्सवा’त तिसºया दिवशीच्या पहिल्या सत्रात ‘एकरी १०० ते १२५ टन ऊस उत्पादन सहज शक्य’ या विषयावर त्यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले.
सतत २० वर्षे एकरी १०० मे़ टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन घेणारे डॉ़ संजय माने म्हणाले, मी १९८८ पासून ऊस शेती करतोय, पूर्वी लागणीचा १८ ते २० मे़ टन तर खोडवा १० मे़ टनच उत्पादन होत होते़ परंतु ऊस उत्पादनवाढीसाठीचे तंत्रज्ञान समजून घेऊन विद्यापीठ, विविध संस्थांमधील विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले.
१९९६-९७ साली प्रथम एकरी १०० मे़ टन उसाचे उत्पादन घेतले़ तेव्हापासून मागे कधी वळून पाहिलेच नाही़ प्रत्येकवर्षी १०० टनापेक्षा जास्त असे सलग २० वर्षे उत्पादन घेत आहे़ त्यांच्या भाषणातील एकेक शब्द ऐकताना लोकमत अॅग्रोत्सवातील उपस्थित शेतकरी आश्चर्यचकित होत होते, पण डॉ़ माने यांनी यात आश्चर्य असे काहीच नाही. तुम्हीही १०० मे टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन घेऊ शकता हे त्यांनी साध्या आणि सोप्या भाषेत शेतकºयांना विविध उदाहरणे देऊन सांगितले़ शेतकºयांनी आता मानसिकता बदलून सकारात्मक पद्धतीने विचार करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
उसाची लागवड पद्धत...
- जमीन सुपीक करण्यासाठी एकरी ४० गाड्या शेणखत, ३ ते ४ टन गांडूळ खत, करंजी, एरंडी, लिंबोणी पेंड, लेंडी खत, हिरवळीचे खत, मळी ५ ते १० टन आदीपैकी जे शक्य असेल ते खत जमिनीन गाडावे़ त्यानंतर ४ ते ५ फूट सरी सोडून दीड ते तीन फूट अंतरावर एक डोळा पद्धत लागवड करावी़ एकरात कमीत कमी ४० ते जास्तीत जास्त ६० हजार उसाचे प्रमाण असावे़ तरच उसाच्या पाल्याला सूर्यप्रकाश मिळू शकते आणि उसाची वाढ होते़ शिवाय फुटवा कमी करण्यासाठी बाळभरणी करणे गरजेचे आहे़ शिवाय उसाला थोडंथोडं सारखं सारखं सतत पाणी देणे गरजेचे असल्याचे संजीव माने यांनी सांगितले़