१४ फेब्रुवारी रोजी मोहोळ येथे लिंगायत वधू-वर परिचय मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:22 AM2021-01-25T04:22:47+5:302021-01-25T04:22:47+5:30
मोहोळ : येथील महात्मा बसवेश्वर सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १४ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय लिंगायत वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन ...
मोहोळ : येथील महात्मा बसवेश्वर सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १४ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय लिंगायत वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर कुर्डे, उपाध्यक्ष अशोक फसके यांनी दिली.
या मेळाव्याचे यंदाचे हे १३ वे वर्ष असून, उद्घाटन नागनाथ देवाचे प्रमुख मानकरी राजेंद्र खर्गे महाराज यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी लिंगायत महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. मोहोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील, माढा नगरपरिषदेचे नगरसेवक चंद्रशेखर गोटे, डॉ. वसंतराव लवंगे, सोमेश्वर दिगंबर स्वामी, श्रीकांत शिवपुजे उपस्थित राहणार आहेत. राजशेखर पाटील (कोरवली), सुरेश शिवपुजे (वडवळ), समाधान कारंडे (यावली), रमेश पावले, अनिल लोखंडे, संजय विभूते, गणपत पुदे अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमासाठी लिंगायत महिला आघाडीच्या अध्यक्ष महानंदा आंडगे,?????
कुंदन बावकर, अरुणा घोंगडे, छाया कुर्डे, सुमन विरपे उपस्थित राहणार आहेत. हा राज्यस्तरीय मेळावा १४ फेब्रुवारीला नागनाथ मंगल कार्यालय मोहोळ येथे सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार आहे. लिंगायत समाजातील सर्व पोट जाती व उपजातीतील नियोजित वधू, वरांनी, त्यांच्या पालकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन संयोजक भीमाशंकर कुर्डे, अशोक फसके यांनी केले आहे.