हॉस्पिटलच्या मनमानीची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:23 AM2021-05-18T04:23:28+5:302021-05-18T04:23:28+5:30
माळशिरस : तालुक्यातील खासगी हॉस्पिटलच्या मनमानी कारभाराबाबत तसेच आरोग्य व महसूल प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची कसून शासकीय चौकशी करण्याची मागणी ...
माळशिरस : तालुक्यातील खासगी हॉस्पिटलच्या मनमानी कारभाराबाबत तसेच आरोग्य व महसूल प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची कसून शासकीय चौकशी करण्याची मागणी पंचायत समितीचे सदस्य अजय सकट यांनी प्रांताधिकारी शमा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. माळशिरस तालुक्यात कोविडचा प्रार्दुभाव वाढला असताना, प्रांताधिकारी, तहसील व आरोग्य प्रशासन सर्वसामान्यांची दखल घेत नाही. हेल्पलाईन सुरु करुनही हॉस्पिटल, बेड उपलब्ध करुन देत नाही. अनेक हॉस्पिटलमधून इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. यामध्ये दोषी असणाऱ्या प्रशासनातील अधिकारी व डॉक्टरांवर तत्काळ कारवाई करावी. हॉस्पिटलमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे बिल आकारणी होत नाही. यासाठी २० मे रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण व योग्य तो चौकशी अहवाल न मिळाल्यास २३ मे रोजी आत्मदहन करणार असल्याचे पत्र अजय सकट यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले आहे.
===Photopath===
170521\img-20210517-wa0413.jpg
===Caption===
निवेदन देताना पंचायत समिती सदस्य अजय सकट