बंदलगी बंधाऱ्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:16 AM2021-06-24T04:16:45+5:302021-06-24T04:16:45+5:30
यावेळी बंडगर यांच्यासमवेत भागवत जोगदनकर, रफिक नदाफ (सरपंच बोळकवठा), अरविंद भंडारे, आमसिद्ध बुळगुंडे, पद्मणा वडरे, भारत बनसोडे, पंडित बुळगुंडे ...
यावेळी बंडगर यांच्यासमवेत भागवत जोगदनकर, रफिक नदाफ (सरपंच बोळकवठा), अरविंद भंडारे, आमसिद्ध बुळगुंडे, पद्मणा वडरे, भारत बनसोडे, पंडित बुळगुंडे (माजी सरपंच संजवाड), सतीश देवकते (उपसरपंच राजुर), तुकाराम मळेवाडी, शिवानंद पुजारी, ज्योत्याप्पा सीनेवडियार, इंद्रजीत लांडगे, बापूराव हल्लोळी, श्रीकृष्ण हलोळी आदी उपस्थित होते.
------
पालकमंत्र्यांकडे तक्रार
बंदलगी बंधाऱ्याचे काम निकृष्ट झाले आहे. या कामाची चौकशी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहे. काम चुकीचे झाल्याने या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
---------
१५ गावांतील शेतीला फटका
बंदलगी बंधारा फुटल्याने चार वर्षांत वडकबाळ, हत्तुर, होनमुर्गी, बिरनाळ, सिंदखेड, राजुर, आहेरवाडी, औराद, बोळकवठा, बंदलगी, हत्तरसंग, कुडल, बरुर, सुलेरजवळगे, कोर्सेगाव, कुमठे आदी १५ गावांतील शेतीला फटका बसला असल्यामुळे उत्पन्न घटले आहे.
--------
फोटो : २३ दक्षिण सोलापूर
बंदलगी बंधाऱ्यांची पाहणी करताना राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब बंडगर, रफिक नदाफ, पंडित बुळगुंडे, भागवत जोगदनकर आदी