‘आयपीएल’ सट्टा; गुजरातच्या बुकीला सोलापुरातील उमानगरीतून केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 12:57 PM2020-12-02T12:57:20+5:302020-12-02T12:57:26+5:30

आजवर १.३० कोटींचा मुद्देमाल हस्तगत : सुमारे ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त

‘IPL’ instead; Bookie from Gujarat arrested from Umanagari in Solapur | ‘आयपीएल’ सट्टा; गुजरातच्या बुकीला सोलापुरातील उमानगरीतून केले जेरबंद

‘आयपीएल’ सट्टा; गुजरातच्या बुकीला सोलापुरातील उमानगरीतून केले जेरबंद

Next

सोलापूर : ‘आयपीएल’ क्रिकेट स्पर्धेदरम्यान सट्टा घेणाऱ्या गुजरातच्या बुकीला सोलापुरातील उमानगरी येथील घरातून अटक करण्यात आली आली. त्यांच्याकडून ३८ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दीपककुमार घनश्याम जोशी (रा. चांनसमा, जि. पाटण, गुजरात. सध्या रा. उमानगरी ) असे अटक करण्यात आलेल्या बुकीचे नाव आहे. गेल्या महिन्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चेतना रामचंद्रन वण्णाल (वय २६, गांधीनगर झोपडपट्टी अक्कलकोटरोड), विघ्नेश नागनाथ गाजूल (वय २४, रा. भद्रावती पेठ) या दोघांना सट्टा घेऊन त्याचा हिशोब पाहत असताना अटक करण्यात आली होती.

याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना आयपीएल सट्ट्यामध्ये लागणाऱ्या रकमेची देवाण-घेवाण दीपककुमार जोशी करीत असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी दि. ३० नोव्हेंबर रोजी येथील घराची झडती घेतली असता त्याच्याजवळ ३८ लाख ५० हजार ३०० रुपये रोख रक्कम मिळून आली. सोबत नोटा मोजण्याचे मशीन, फेक नोट डिटेक्टर मशीन असा एकूण ३८ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

आजवर १.३० कोटींचा मुद्देमाल हस्तगत

- गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत आजवर सोलापूर, गुलबर्गा, नागपूर येथून ११ आरोपींना अटक करण्यात आली असून, एक कोटी ३० लाख ४७ हजार पाच रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ‘आयपीएल’ मधील अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस करीत आहेत.

यांनी केली कारवाई

- ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त बापू बांगर, पोलीस आयुक्त अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक अजित कुंभार, सचिन बंडगर, हवालदार औदुंबर आटोळे, जयसिंग भोई, संजय साळुंखे, सिद्धाराम देशमुख, सुहास अर्जुन, आरती यादव, नेताजी गुंड यांनी पार पाडली.

Web Title: ‘IPL’ instead; Bookie from Gujarat arrested from Umanagari in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.