ऊस बागायतदारांना पाटबंधारे विभागाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:37 AM2020-12-12T04:37:43+5:302020-12-12T04:37:43+5:30
दुष्काळ, अतिवृष्टी, कोरोना महामारी, ढासळलेली साखर कारखानदारी, वेगवेगळ्या रोगांचा विळखा, घटलेले उत्पादन अशा संकटाचा सामना करत ऊस उत्पादकांनी लाखो ...
दुष्काळ, अतिवृष्टी, कोरोना महामारी, ढासळलेली साखर कारखानदारी, वेगवेगळ्या रोगांचा विळखा, घटलेले उत्पादन अशा संकटाचा सामना करत ऊस उत्पादकांनी लाखो रुपयांचे कर्ज डोक्यावर घेऊन ऊस शेती जोपासली आहे. ही शेती करताना पाटबंधारे विभागाचे पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल करणे आवश्यक आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या विहिरीवर जोपासलेल्या ऊस उत्पादकांना पाटबंधारे विभागाने ऊस बिलातून ठरावीक रक्कम कपात करून घेतल्यामुळे अशा शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त होत आहे.
माझी शेती मुख्य कालव्यापासून ५ ते ६ किमीविरुद्ध बाजूला आहे. स्वतःच्या विहिरीच्या पाण्यावर ठिबक सिंचनाव्दारे जोपासलेला ऊस कारखान्याला दिल्यानंतर पैसे कपात झाले. याबाबत पाटबंधारे विभागात चौकशी केल्यानंतर सर्वांचेच पैसे कपात झाले असल्याचे सांगत आहेत.
-संजय हुलगे, शेतकरी, गोरडवाडी
लाभक्षेत्र सोडून जे अनधिकृतपणे पाइपने पाणी घेतात त्यांची पाणीपट्टी उसातून कपात होते. गेल्या वर्षी नेमके किती व कसे कपात झाले हे पाहावे लागेल. माळीनगर व श्रीपूर कारखान्यामार्फत पाणीपट्टी कपात झाली होती.
-अमोल मस्कर, सहाय्यक अभियंता, पाटबंधारे विभाग
-----