वाटलं दोन महिने चांगला पाऊस झाला; बरं झालं, पण ऑगस्ट महिन्यानं दगा दिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:26 AM2021-09-05T04:26:29+5:302021-09-05T04:26:29+5:30
सोलापूर जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यापासून चांगला पाऊस पडत असला तरी २५ जुलै ते १८ ऑगस्टदरम्यान २४ दिवस पावसाने दडी ...
सोलापूर जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यापासून चांगला पाऊस पडत असला तरी २५ जुलै ते १८ ऑगस्टदरम्यान २४ दिवस पावसाने दडी मारली होती. पाऊस लांबल्याचा फटका खरीप पिकांना चांगलाच बसला आहे. जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात ३२२ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३६४ मि.मी. पाऊस पडला. म्हणजे सरासरीच्या ११२.८ टक्के पाऊस जून-जुलै व ऑगस्ट महिन्यात पडला.
केवळ ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात १०७.५ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना अवघा ७८.४ मि.मी. म्हणजे ८६.२ टक्के इतकाच पाऊस पडला आहे. मात्र जून, जुलै या दोन महिन्यात १९७ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असताना २७३ म्हणजे १३८.४ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली होती.
जिल्ह्यातील ९२ मंडळात सरासरीच्या ११२.८ टक्के इतका पाऊस पडला असला तरी २८ मंडळात १०० टक्केपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.
----
या मंडलात कमी पाऊस
..
मंद्रुप (दक्षिण सोलापूर), उपळेदुमाला, गौडगाव, पांगरी, सुर्डी व खांडवी (बार्शी), तडवळ, दुधनी, मैंदगी, वागदरी, किणी (अक्कलकोट), कुर्डूवाडी, रांजणी (माढा), भाळवणी, पटवर्धन कुरोली (पंढरपूर), करमाळा, केम, जेऊर, कोर्टी, उमरड, केत्तुर (करमाळा), इस्लामपूर, सदाशिवनगर, दहीगाव, नातेपुते, अकलूज, लवंग, वेळापूर ( माळशिरस) यांचा समावेश आहे.
---
चार मंडळात सर्वाधिक पाऊस
मंगळवेढा मंडळात १८७ टक्के पाऊस पडला आहे. महाळुंग मंडळात १८८ टक्के, मारापूर १५९ टक्के, कामती १५४ टक्के इतका पाऊस पडला आहे. अक्कलकोट तालुक्यातील तडवळ मंडळात सर्वात कमी ५७ टक्के व दहीगाव मंडळात ५९.७ टक्के पाऊस पडला आहे.
.......
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी
मंगळवेढा : १३८.२ टक्के, मोहोळ : १२७.५ टक्के, सांगोला : १२१.६ टक्के, उत्तर सोलापूर : ११७.८ टक्के, पंढरपूर : ११५.४ टक्के, माढा ११०.५ टक्के, दक्षिण सोलापूर : १११.८ टक्के, बार्शी : १०६.१ टक्के, अक्कलकोट : १०० टक्के, माळशिरस : ९८.४ टक्के, करमाळा : ९५.२ टक्के.