सत्ता असल्याने बारामतीकरांचा पालकमंत्र्यांच्या आडून नवा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:27 AM2021-04-30T04:27:25+5:302021-04-30T04:27:25+5:30
कुर्डूवाडी येथील कोविड सेंटर तपासणी दौऱ्यानिमित्त आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माढा लोकसभा मतदारसंघातील कोरोना परिस्थितीचा ...
कुर्डूवाडी येथील कोविड सेंटर तपासणी दौऱ्यानिमित्त आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माढा लोकसभा मतदारसंघातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार नाईक- निंबाळकर हे कुर्डूवाडीत आले होते. त्यावेळी त्यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी कोरोनाबाबत सद्यस्थिती जाणून घेतली.
यावेळी मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात सुरू असलेल्या कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांशी संवाद साधला. तसेच अडचणींबाबत त्यांच्याशी चर्चाही केली. यावेळी उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, मुख्याधिकारी समीर भूमकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, स्वेरीचे प्राचार्य पी. बी. रोंगे, माढा तालुका भाजप सरचिटणीस योगेश पाटील, करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, अभियंता विजयसिंह परबत, सुधीर गाडेकर, तालुका चिटणीस प्रकाश चोपडे, संभाजी चव्हाण, दिनेश शिंदे उपस्थित होते.
----
अस्थिरीकरणाच्या नावावर लोकसभेचे स्थिरीकरण
खासदार नाईक-निंबाळकर म्हणालजे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरला ५ टीमसी पाणी नेल्याचा जो विषय आहे. त्याचा संपूर्ण प्रस्ताव मी वाचलाय. अस्थिरीकरणाच्या नावावर बारामती लोकसभेचे स्थिरीकरण करण्याचा नवीन घातलेला हा घाट आहे. सोलापूर व सातारा या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर बारामतीकरांनी अशाच प्रकारे निरा-देवधर व उजनी या दोन्ही धरणांवर पाणीचोरीचा घाट घातला आहे. राज्य सरकार सगळ्यांनी आणायचं आणि त्यावर राज्य फक्त बारामतीकरांनी करायचं अशा प्रकारचा प्रयोग सध्या महाराष्ट्रात दिसतोय. लवकर हे सरकार आणि राज्य उलथून पडेल. मग राज्याची सत्ता बदलल्यानंतर हे संपूर्ण चित्रदेखील बदललेले दिसेल. उजनी धरण पाणीचोरीच्या संपूर्ण प्रकरणात माझा कायम विरोध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो
२९कुर्डूवाडी०१
कुर्डूवाडी येथील कोविड केअर सेंटरला भेट दिल्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक -निंबाळकर यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, मुख्याधिकारी समीर भूमकर आदी.