अल्लाहवरील श्रद्धेतून रोजा करण्याची मिळते ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 01:38 PM2019-05-30T13:38:24+5:302019-05-30T13:39:23+5:30

रमजान ईद विशेष; उन्हाची तमा न बाळगता ज्येष्ठ नागरिकही करतात उपवास

It is the power to get relief from the faith of Allah | अल्लाहवरील श्रद्धेतून रोजा करण्याची मिळते ऊर्जा

अल्लाहवरील श्रद्धेतून रोजा करण्याची मिळते ऊर्जा

googlenewsNext
ठळक मुद्देइस्लाममध्ये पाच अंमल सांगण्यात आले आहेत. या पाच अंमलमध्ये अल्लाहवरील श्रद्धा, नमाज, रोजा, जकात आणि हज यांचा समावेश आहेअल्लाहची भक्ती करत असताना त्यातूनच उपवास करण्याची ऊर्जा मिळते

सोलापूर : इस्लाममध्ये रमजान महिन्यात रोजा करण्याला मोठे महत्त्व आहे. इस्लाममध्ये सांगण्यात आलेल्या पाच अंमलपैकी रोजा हा एक महत्त्वाचा अंमल आहे. यावर्षी रमजान मे महिन्यात आल्यामुळे रोजा करणाºया व्यक्तीस याचा त्रास होतो, असे असतानादेखील ज्येष्ठ नागरिक रोजा करतातच.

इस्लाममध्ये पाच अंमल सांगण्यात आले आहेत. या पाच अंमलमध्ये अल्लाहवरील श्रद्धा, नमाज, रोजा, जकात आणि हज यांचा समावेश आहे. रमजान महिन्यात मुस्लीम बांधव महिनाभर रोजा (उपवास) करतात. अल्लाहची भक्ती करत असताना त्यातूनच उपवास करण्याची ऊर्जा मिळते. यामुळे रोजा करत असतानादेखील कोणताही त्रास होत नसल्याचे रोजा करणाºया ज्येष्ठ नागरिकांचे मत आहे. 

जवळपास दर ३३ वर्षांनंतर उन्हाळ्यात रमजान महिना येतो. उन्हामुळे रोजा करताना काही अडचणी येतात. या महिन्यात पहाटे चार ते साडेचारदरम्यान सहेरी करण्यात येते. त्यानंतर कुरआनचे पठण केले जाते. सकाळी आठ वाजल्यानंतर कामाला सुरुवात करतो. दुपारी तीन ते पाच आराम करतो. त्यानंतर सहेरीची तयारी करतो. रोजादरम्यान कितीही तहान लागली तरी पाणी पित नाही. अल्लाहची ईबादत करण्यात खरे समाधान आहे.
डॉ. रफिक सय्यद

१९५५ मध्ये मी पाच वर्षांचा होतो, तेव्हापासून उपवास करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता तिसºयांदा मे महिन्यात रमजान आला आहे. मे महिन्यात ऊन असल्यामुळे काळजी घ्यावी लागते. आता मी ७० वर्षांचा असून, सेवानिवृत्त झाल्यानंतर एका खासगी ठिकाणी काम करत आहे. काम करत असतानादेखील मी रोजा करतो. यामुळे जे गरीब आहेत, ज्यांना खायला मिळत नाही, त्यांचे दु:ख समजायला मदत होते.
- रजाक दखणी

हा देह अल्लाहने दिला आहे. अल्लाहसाठी जर हा देह झिजला तर काही फरक पडत नाही. रमजान महिन्यात रोजा केल्याने अल्लाहच्या जवळ जाता येते. या महिन्यात मी दिवसातून पाच वेळा नमाज अदा करतो. रोजा करत असताना घसा कोरडा पडतो. शरीराची उष्णता वाढते. कामावर मला जास्त बोलावे लागते़ त्यामुळे थोडा त्रास होतो. पण हे सहन करण्याची ताकददेखील अल्लाहच देतो.
- महिबूब शेख

रमजान महिन्यात मक्का-मदिना येथे जाणे खूप महत्त्वाचे समजले जाते. यंदाच्या रमजान महिन्यात मी मदिना येथे गेलो आहे. या भागात उन्हाचे प्रमाण जास्त आहे. तरीदेखील रमजानमधील सर्व रोजे तसेच दर शुक्रवारी उमराही करतो. यादरम्यान अल्लाहकडे प्रार्थना करतो. यातून मोठे आत्मीक समाधान मिळते. रोजा केल्याने मन शांत तर राहतेच यासोबतच इतरांच्या कल्याणासाठी आराधना केल्याचे सुखही मिळते. 
- इक्बाल बाबूमियाँ शेख

Web Title: It is the power to get relief from the faith of Allah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.