बेस्ट झालं पाऊस झाला पेरण्या अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:16 AM2021-07-11T04:16:50+5:302021-07-11T04:16:50+5:30

तालुक्यातील दहा मंडळांत पावसाळ्याच्या सुरुवातीचा पाऊस पडला. मात्र, नंतर तो तालुक्यात सर्वदूर पडता कमी-अधिक प्रमाणात पडला आहे. जून महिन्यात ...

It rained best in the final stages of sowing | बेस्ट झालं पाऊस झाला पेरण्या अंतिम टप्प्यात

बेस्ट झालं पाऊस झाला पेरण्या अंतिम टप्प्यात

Next

तालुक्यातील दहा मंडळांत पावसाळ्याच्या सुरुवातीचा पाऊस पडला. मात्र, नंतर तो तालुक्यात सर्वदूर पडता कमी-अधिक प्रमाणात पडला आहे. जून महिन्यात तालुक्यात १५८.४ सरासरीच्या १४७.६ टक्के पाऊस पडला आहे. मात्र, या पावसामध्ये खंड असल्यामुळे काही भागांत पेरणीची ओल कमी-अधिक प्रमाणात होती. जुलै महिन्याची सरासरी ही ३६ मिमी आहे. नऊ दिवसांत १५.५ मिमी पाऊस पडला आहे.

---

सोयाबीनची सर्वाधिक पेरणी

या वर्षी तालुक्यातील तुरीचे क्षेत्र हे घटले आहे, तर मागील वर्षीप्रमाणे यंदाही सोयाबीन आणि त्या खालोखाल उडदाची पेरणी सर्वाधिक झाली आहे.

---

पेरणी झालेले क्षेत्र

सोयाबीन- ३५,५१९ , तूर- ७,७२४, उडीद- ९,३७७, मूग- १,१७९, भुईमूग- ११०, मका- १,०३७ , कांदा- ६४२, तर मिरची ३२ हे. याप्रमाणे खरीप हंगामात खरीप पिके व भाजीपाला याची लागवड झालेली आहे. या आठवड्यातही पाऊस पडत आहे. त्यामुळे ज्यांच्या पेरण्या राहिल्या आहेत, त्याही पूर्ण होतील.

----

Web Title: It rained best in the final stages of sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.